रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

धुम - ३ - MOVIE REVIEW

धुम - ३

वर्षाचा सर्वात महागडा आणि आतुरतेने वाट पहायला लावणारा चित्रपट "धुम-३" काल बघण्यात आला .
यशराज बॅनरच्या "रोजगार हामी योजना" अंतर्गत अभिषेक आणि उदय यांना काम देण्याकरीता "धुम" या चित्रपटांची साखळी तयार केली आहे असे फेबु ट्विटर भाष्य केले आहे......काही अर्थी हे बरोबरच आहे.

खरतर धुम -१ आणि धुम-२ हे चित्रपट तयार करताना काही लॉजिक वापरलेले होते..
पहिल्या धुम मधे जॉन बाईक वर आपली गँग घेउन पैसे लुटायचे.. मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक बाईक्स नसल्याने तसेच चोरांच्या बाईक्स २००किमी पेक्षा जास्त वेगाने पळत असल्याने त्यांचे फावत होते या साठी जय दिक्षित अली ला मदतीला घेतो.. आनि त्यांच्याच वेगाने पाठलाग करत त्यांना पकडतो..इतके पैसे चोरायचे असल्याने जॉन आपली गँग बनवतो. (लॉजिक) गँग च्या मदतीने प्रत्यक्ष चोरी देखील केली..
दुसर्या धुम मधे हृतिक रोशन ने या चित्रपटाची उंची प्रचंड म्हणजे प्रचंडच वाढवुन ठेवली..ह्रितीक चोरी फक्त एका अमुल्य वस्तुचीच करायचा...एखादा राजघराण्याचा हार, या दुर्मिळ नाणी, महाग हिरा.. अश्या छोट्या पण अत्यंत मुल्यवान वस्तुंची चोरी करायचा म्हणुन तो एकटा होता.. चोरी करताना त्याने अनेक क्लूप्त्या लढवल्या .. वेशांतर केले.. मुर्ती झाला बुटका झाला खुप काही केले...इतके केले की बहुदा काही शिल्लक ठेवलेच नाही.. ह्रितीक विदेशात चोरी करत करत भारतात आला..आणि जय दिक्षित त्याच्या मागे लागला ..(लॉजिक)
आता आपण येउया धुम-३ च्या कथेवर ..
अमेरिकेत शिकागो या शहरी "ग्रेट इंडीयन सर्कस" जॅकि श्रॉफ चालवत असतो..प्रचंड कर्ज घेतलेले असते .. हे कर्ज फेडण्यासाठी तो बँकेची मदत मागतो.. त्यासाठी शो देखील आयोजित करतो परंतु बँक कर्ज देण्यास नकार देते...कर्जाच्या चिंतेत जॅकी आत्महत्या आपल्या लहान मुलासमोर आणि बॅकेच्या अधिकार्यांसमोरच करतो.
जॅकिचा मुलगा साहीर (आमिर खान) मोठा झाल्यावर त्या बँकेचा बदला घेण्याचे ठरवतो आणि बँकेच्या प्रत्येक शाखा लुटण्यास प्रारंभ करतो एकटाच (लॉजिक???????????) .. एका बाजुला सर्कस देखील चालु करतो... बँक लुटताना साहीर हिंदीत संदेश लिहित असतो.. म्हणुन भारतातुन जय दिक्षित आणि अली यांना पाचारण केले जाते (लॉजिक???? )
जय दिक्षित केस ची स्टडी करतो..आणि साहीर च्या मागे लागतो.. साहीर वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन ?????? जय दिक्षित ला वेळोवेळी मात देतो.. या क्लुप्त्यांमागे एक मोठे "रहस्य" असते जे इंटरवेल आधीच उघडले जाते खो खो ..
शेवटी आमिर चे रहस्य जे प्रेक्षकांना आधीच कळते ते जय दिक्षित ला कळते का ?
बँक उध्वस्त होते का...??? कशी होते... ?

हे सगळे बघण्यासाठी धुम - ३ पहावा लागेल . (मी आग्रह करत नाही आहे...हम तो डुबे है सनम ले तुझे भी डुबे)
चला आता इतर बाबींकडे लक्ष देउ या...
आदित्य चोप्रा यांनी अमेरिकन्स ची लायकी या चित्रपटात काढली आहे... शिकागो पोलिस हे मुंबई पोलिस पेक्षा चांगले असुच शकत नाही .. अज्याबात नाय.. नही बिल्कुल ही नही है....नोनो नो .. म्हणुनच मुंबई पोलिस मधले एसीपी जय दिक्षित आनि इंस्पेक्टर (ज्याला साधी इंग्लिश येत नाही डोळा मारा ) अली यांना शिकागोला पाठवण्यात येते (मागच्या चित्रपटात विदेशात जाउन चोर पकडण्याचा अनुभव असल्यानेच त्यांचे सिलेक्शन होते असा दाट गाढा थिक संशय मला आहे) चोरसाहेबांनी चोरी करताना हिंदीत संदेश लिहिल्याने भारतातुन मदत शिकागो पोलिस मागतात
असो. जय - अली शिकागो ला पोहचतात आणि लगेच जाहीर करतात एकाच बँकच्या शाखा लुटल्या गेलेल्या आहे..( हे शिकागो पोलिसांना कळत नाय) म्हणुन बँकेचा शत्रुचेच काम आहे ...

"द ग्रेट इंडीअन सर्कस" प्रचंड कर्जात बुडालेली असते..ती ऑक्शन होते..(बहुदा कारण चित्रपटात बँकेचे अधिकारी तसे बोलताना दाखवले आहे.) अश्या प्रचंड रकमेच्या कर्जाची परतफेड साहीर कसा करतो..? चला एकवेळ मानु की बँक लुटुन तो पैसे मिळवतो ...तर कर्जाच्या रकमेची परतफेड करताना इंकमटॅक्स वाले विचारत नाही का ...ए बाबा तु इतके पैसे कुठुन आणलेस .." तु तर काही कामधंदा करताना तर दिसत नाही..(दाखवलेच नाही ) मग सर्कस उभी कशी कोणत्या पैश्यातुन करत आहेस... हे अमेरिकन ढिसाळ कारभारावर मार्मिक बोट दाखवत आहे त्यांच्याकडे देखील भारतासारखाच भ्रष्टाचार माजलेला आहे..ढिसाळ कारभार करतात लेकाचे.. एक सामान्य मुलगा प्रचंड कर्ज्यात असलेली सर्कस सोडवतो काही ही कामधंदे न करता त्याची साधी चौकशी होउ नये ?
चोर चित्रपटात मुख्य भाग असतो ती चोरी कशी होते.. यावर दिग्दर्शकाचा मुख्य भर असतो.. च्यामायला या बिनडोक चित्रपटात चोरी दाखवलीच नाही निव्वळ चोरी कशी करायची याचे प्लॅनिंग चित्रपट भर साहीर करत असतो.. आपण मात्र वाट बघत असतो की अरे आता होईल चोरी मग होईल चोरी... दर्शकांना कळते कधी जेव्हा साहीर बँकेच्या बाहेर बाईक वरुन येतो आणि पळतो ...तेव्हा समजते..... हे भगवान चोरी हो भी गयी और पता भी नही चला.... मग सगळे त्याच्या मागे लागतात .. पाठलाग सुरु...
अरे कुठेतरी दाखवा चोरी कशी केली ? तुमच्या कडे चोरी करण्याच्या क्लुप्त्या नाहीत का.? की तुम्हालाच समजले नाही चोरी झाली ते.. निव्वळ आमिर ला बँके बाहेर पळवले की झाली चोरी....

चला केली चोरी....मग पैसे कशाला उधळत फिरायचे.... एक इटुकली पिटुकली बॅग पाठिला अडकवली की झाले आला चोरीचा माल..?? अरे इतके कर्ज आहे तर किमान १०-१५ सुटकेस हवे ना पैश्याने भरलेले...किमान एक नोटेची किंमत १०००$ जरी धरली तरी १ करोड पाहिजे असे धरले तरी १०००० नोटा लागतील आता १०००० नोटेंसाठी एक "इंटुकली पिंटुकली" बॅगेत १०००० नोटा काय येतील का ? (लॉजिक????????)

इतकी मोठी बँक फक्त ३-४ बँकेत चोरी केल्यावर उधवस्त होईल का? काय लुटतो ते ही कळत नाही .. पैसे उधळत जातो मग स्वतः काय घेउन जातो हा ?
आमिर ची हाईट फार मोठी चुकीची दाखवली आहे....त्यामुळे त्याच्या संपुर्ण व्यक्तिरेखेवर वाईट प्रभाव पडतो.. नको त्या ठिकाणी त्याला अतिशय बुटका दाखवलेले आहे.. सुरुवातीला कटरिना आनि आमिर एकाच हाईट ची दाखवले आहे...६=६
नंतर अभिषेक आमिर समोर आल्यावर आमिर एकदमच छोटा वाटतो अगदी त्याच्या खांद्याच्या सुध्दा खाली लागतो ६.५ = ५
आणि शेवटी अभिषेक कटरिनाला भेटतो तेव्हा कटरिना अभिषेक च्या उंची जवळपास दिसते. ६.५=६

मग जेव्हा आमिर अभिषेक समोर असतो तेव्हा ५फुटी कसा होतो आणि कटरिना बरोबर असताना लगेच १ फुट वाढुन ६ फुटी कसा होतो......... (दया पता लगाओ जरुर हाईट मे काली दाल मिली हुई है)
आता तुम्हाला वाटत असेल अरे फक्त आमिर आणि अभिषेकवर लिहिले कतरिनावर नाही.....तर माझ्या प्रिय मित्रांनो तुमची अत्यंत आवडती कटरिनावर ३ गाणी आहेत....झालात ना खुश...अजुन बोनस म्हणुन तिला संपुर्ण चित्रपटात ५-६ वाक्य देखील बोलायला दिली आहेत....आमिरखान चे धन्यवाद जे इतके मोठे फुटेज तिला दिले....
चित्रपटाची गाणी फक्त तोंडी लावण्यापुरती आहेत... टॅप डांस हवा तेव्हढा प्रभाव पाडत नाही .. रितिक च्या धुम डांस ची बरोबरी करण्याकरीताच बहुदा हा डांस घेतलेला आहे.. आमिर बिल्कुल नाचताना आकर्षक दिसलेला नाही..
मलंग... अत्यंत सुंदर आणि भन्नाट .. प्रचंड खर्च करुन याला आकर्षक बनवलेले आहे.. वर एरो डांस वगैरे जे आपण डीआयडी मधे बघत होतो नाचा चे प्रकार तसेच प्रकार यात दाखवले गेलेले आहे... सुंदर नाच आणि करामती आमिर आणि कटरिनाने केलेल्या आहेत...
कमली या गाण्यात कटरिनाने चांगले मुव्ह्स दाखवले आहेत परंतु.......ते सलग न असता तुकड्या तुकड्यात असल्याने लवकर कळते की एक एक स्टेप्स घेत शुटींग घेतलेले आहे.. काही सलग आहेत त्यात.... ज्यात कतरिनाने खरच चांगला प्रयत्न केलेला आहे... गोड आणि खरच सुंदर दिसते.....

अ‍ॅक्शन्स फक्त इंटरवल पर्यंत च आहेत त्यानंतर अतिशय संथ होतो चित्रपट उगाच त्याला भावनात्मक करण्याच्या नादात त्याचा टेम्पो बिघडवला.. चित्रपटाचे नाव धुम आहे म्हणुन बहुदा फक्त पाठलाग बाईक्स यावरच भर दिलेला आहे.. चित्रपटाच्या ९०% फ्रेम मधे फक्त आणि फक्त आमिरच दिसतो..
अभिनय :- अभिनयात जॅकि श्रॉफ आणि छोटा आमिर झालेला मुलगा भाव खाउन जातात.. लहान मुलाने तर कमालच केली आहे.. अनेक प्रसंगात त्याचा चेहरा बोलका झालेला आहे... आमिर खान जिनिअस.. निव्वळ अप्रतिम एकाच वेळी त्याने विविध कांगोरे उभे केले आहे बर्याच ठिकाणी तो निव्वळ चेहर्यातुन फरक दाखवुन देतो.. परंतु मी आमिर खान आहे......हे त्याला खाली खेचते... आयुष्यात पहिल्यांदा खलनायकी भुमिका करताना कोणत्याही बाजुने खलनायक वाटला नाही.. स्क्रिप्ट लिहिताना देखील त्याला खलनायक न दाखवता अत्याचार झालेला युवक दाखवले गेले.. त्यामुळे तो मनाला भिडत नाही...त्याचे एक रुप किमान खलनायकी दाखवायला हवे होते.... तर तो ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट छान उभा राहिला असता.. परंतु सगळेच रुप गुडीगुडी करण्याच्या नादात सगळे केर मुसळात जातात...
खलनायकी करताना कधी तो डर , माय नेम इस खान मधला शाहरुख होतो..कधी धुम-२ च्या रितिक सारखा तर कधी धुम-१ च्या जॉन सारखा ..त्यामुळे आपल्याला आमिर कमीच दिसतो... तरी ही त्याची पकड शेवट पर्यंत सुटत नाही.चित्रपटावरुन... शेवटच्या फ्रेम पर्यंत आमिर वरच आपली नजर खिळुन असते... आणि हाच त्याचा स्ट्राँग पॉईंट आहे.....

अभिषेक आणि उदय यांच्या रोजगारा करिता त्यांना यात घेतले असल्याने त्यांच्या अभिनयावर काही बोलुन मी त्यांचा जाहीर अपमान करु इच्छित नाही..
आमिर चा चित्रपट स्क्रिप्ट ने परफेक्ट असायचा कमीत कमी लुपपोल्स असायचे त्यात.. आमिर स्वतः जातीने लक्ष द्यायचा .... परंतु "द - लाश" आणि "धोबीघाट" पासुन त्याने यावर लक्ष द्यायचे कमी केले असे वाटते..
निव्वळ स्पर्धेत उतरायचे ..पहिल्यांदाच खलनायक साकारायचा या निमित्ताने बहुदा आमिर चे दुर्लक्ष झाले आहे ... अरेरे चुका तर सगळ्याच चित्रपटात असतात.. अतिशयोक्ती सगळ्यातच असते यालाच बहुतेक लिबर्टी घेणे म्हणतात परंतु कैच्याकै घेउ नका. पटेल असे घ्या.......

बहुदा या चित्रपटामुळे शिकागो पोलिस आदित्य चोप्रावर केस दाखल करणार असे दिसत आहे...
असो............. पहिला भाग भन्नाट पाठलाग अप्रतिम लोकेशन्स ...... आणि दुसरा भाग अत्यंत संथ रटाळ थोडेफार धक्के ...... याचे मिश्रण बघायचा असल्यास बघावा.......
मी निव्वळ आमिर खान या चित्रपटात आहे म्हणुन गेलेलो...... त्यापेक्षा शुक्रवारचा "२४" मालिकेचा एपिसोड बघितला असता तर बरे झाले असते असे वाटत आहे.....

"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन. - MOVIE REVIEW

"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन.

----------------------------------------
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. स्मित
मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........
विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...
चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...
सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......
अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे डोळा मारा )
इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..
मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे
चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..

थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच

"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन.

----------------------------------------
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. स्मित
मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........
विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...
चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...
सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......
अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे डोळा मारा )
इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..
मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे
चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..

थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच

चेन्नई एक्सप्रेस !! - MOVIE REVIEW

चेन्नई एक्सप्रेस !!
मनोरंजनात्मक चित्रपट आहे ... फार काही भव्यदिव्य आगळीवेगळी कथा नाही आहे.. मुळात कथा आणि स्क्रिप्ट ही
"थोडक्यात उत्तरे लिहा" या टाईप ची लिहिलेली आहे.. रोहित शेट्टीला प्रश्न पडतात आणि तो त्या प्रश्नांचे थोडक्यात ४-५ ओळी उत्तर लिहितो...या टाईप ची कथा बहुदा लिहिलेली आहे.. पण उगाच ठिगळ लावल्यासारखे जोड जोडले नाही हे नशिब आपले.. सरळ सोप्पी कथा... एक हिरो जो मौजमजा करायला जात असताना चुकुन एका लफड्यात अडकतो आणि त्याचे जीवन आणि नशिब दोन्ही त्यामुळे बदलते .. कथा तर "रसप"जींनी वर सांगितलीच आहे... डोळा मारा
त्यामुळे तेच तेच उगाळत बसायला अर्थ नाही .... चित्रपटावर बोलु
नकारात्मक : - ४० वर्षापर्यंत अजुन लग्न झाले नाही हिरोचे ? इतके कशात गुरफटलेला ? चला भारताच्या मोठ्या पक्षाचा वारस वगैरे असता तर एक वेळ लक्षात आले असते डोळा मारा पण आजोबांच्या बरोबर आज्जी होती ना.. ? मग जवाबदारी फक्त दुकानाचीच आहे ? चला प्रेमात बिब्बा घालण्याचे काम आजोबांनी केले तर अरेंज मॅरेज नावाची सुध्दा एक पध्दत आहे लग्नाची ..... ती का नाही वापरली कधी...? आज्जीला सुध्दा वाटले नाही का?
४० वर्षाचा आहे हिरो...ठिक आहे मग हिरोईन कशी पडते प्रेमात ? ती सुध्दा किमान३२-३४ ची दाखवायला हवी..? ती दिसते २४ ची .. असे वाटत होते की " ४६चा सलमान बरोबर २४ ची कटरिना" यांच्या प्रेमावरुन ढापलेले आहे डोळा मारा असो..
दिपीका दिसते छान सुंदर परंतु तिला तामिळ अ‍ॅक्सेंट मधे बोलताना उगाचच चेहरा वाकडा करावा लागत होता..सरळ चेहर्याने देखील बोलु शकत होती ?
निकितन ला नाही घेतला असता तर चालला असता.. शाहरुख एकदम त्याच्या समोर लय म्हनजे लयच दिसत होता.. त्याची लांबी किमान ६.५ फुट रुंदी किमान ४.५ फुट तरी असेल ( मी लाकडाच्या ओंडक्याबद्दल नाही निकितन या अभिनेत्याबद्दल बोलत आहे) .. खली समोर पोपटलाल (तारक मेहतावाला) वाटत होता...स्मित
त्यापेक्षा दुसरा थोडा कमी लांबीरुंदीचा घेतला असता तरी चालले असते . (खर तर पटले असते असे म्हणायला हवे)
शेवटची हाणामारी कमी करुन फक्त फोकस निकितन आणि शाहरुख वरच ठेवला तो ही थोडक्यात तर अजुन परिणामकारक झाली असती)
सकारात्मकः- चित्रपटाची सुरवात अतिशय सकारात्मक पध्दतीने झाली आहे.. ही बाब फारच कमी लोकांच्या लक्षात आली असेल (म्हणुन म्हणतो डोके घेउन जा डोळा मारा ) टायट्ल्स दाखवताना सर्वात आधी "दिपिका पदुकोण" हिचे नाव येते मग "शाहरुख खान" चे नाव येते.. देशात चाललेल्या महिलांबद्दल असलेली वैचारिक आणि मानसिक स्थितीत हा बदल नक्कीच परिणामकारक आहे याबद्दल शाहरुख खान , रोहीत शेट्टी आणि टिम चे अभिनंदन ... बदल छोटासा आहे पण.... एक पाउल पुढे पडले आहे..
या चित्रपटात महिलांच्या बाबतीत एक महत्वाची काळजी घेतली आहे.. कुठेही महिलांवर चुकिचे चित्रण अथवा उलटेसुलटे दाखवले नाही...
कुठेही दिपिकाला थिल्लर पणा अथवा अश्लिल दिसायला भाग पाडले नाही .. संपुर्ण साडीत आणि एका विशिष्ट मर्यादेत ठेवलेली आहे.. इतकेच काय तर तिचे अपहरण करणार्यांना तिचे ऐकवावे लागते आणि तिच्याशी अदब बाळगुन बोलताना दाखवले आहे.....आयटम साँग च्या नावाखाली प्रियामणी सारख्या अभिनेत्रीला फुटकळ आणि गल्ल्लाभरु हावभाव करावे लागले नाहीत... मुळात त्या गाण्याच्या वेळेच्य ४० % च दाखवली आहे.. बाकी गाणे शाहरुख आनि इतर तामिळ पुरुष लोकांवरच जास्त फोकस करण्यात आलेला आहे..
दिल्लीतल्या प्रकरणावरुन एके ठिकाणी बोलताना शाहरुख आणि रोहित यांनी स्पष्ट केलेले होते की आमच्या चित्रपटात कुठेही अनावश्यक ठिकाणी महिलांचा अपमान होईल आणि त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल असे कोणतेही प्रसंग दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल.. .. एक प्रकारे हा सम्मान दिला गेलेला आहे.. आणि एकप्रकारचे चित्रपटात आलेली "सोफ्ट्पोर्न" ची लाट हिला किनारी लावले आहे..
तसेच चित्रपटाचे बरेचसे संवाद तामिळ मधुनच आहेत .. आता हा बदल जरा वेगळा आहे.. तामिळनाडु मधे फारसे हिंदी बोलले जातच नाही अथवा येत असले तरी उत्तर हिंदीतुन देत नाहीत .. ही झाली शहरातली परिस्थिती गाव तर अजुन जास्त असेल.. अश्यावेळेला गावातल्यांना हिंदी बोलताना दाखवतील का ? विरोधाभास नाही का वाटणार ? एकी कडे आपण असे म्हणतो की फॉरेन मधे चित्रिकरण असलेल्या चित्रपटातले लोक हिंदी कसे काय बोलतात ? इंग्लिश का नाही बोलत ? फॉरेन मधे काय हिंदी कळते का कुणाला? आणि तेच जर या सारख्या चित्रपटात बरोबर तामिळच बोलताना दाखवले तरी काही लोकांना प्रोब्लेम ? चित भी मेरी पट भी मेरीच ? खो खो तामिळ भाषेत काय बोलणे झाले हे दिपिका अ सबटायटलर डोळा मारा हिच्या संवादातुन नंतर कळतेच काही ठिकाणी पंजाबी इंस्पेक्टर द्वारे सुध्दा हिंदीमधे भाषांतर केले आहे... संवाद बोलताना आपल्याला भावार्थ कळतोच की ? मग कशाला हवा तो अट्टाहस की हिंदी सबटाईटल्सच हवीत खाली ? मुंबई पुणे यासारखी ठिकाणी राहिलेली असल्यामुळे दिपिकाला मराठी सुध्दा चांगलेच येते ( नानाची टांग तुझ्या आईचा घो) तरी पण तिच्या भाषेतला तामिळ अ‍ॅक्सेंट जात नाही.. तो बर्याच दक्षिणभारतीय लोकांचा जात नाहीच...
मारामारीमधे सुध्दा काही ठिकाणी अतिशयोक्ती सोडली तरी रिअलिटीजवळ जाणारी आहे... गाड्या उडवणे .. कोयत्याने टायर ला मारुन ती उडवणे अश्या सारखे प्रसंग सोडले तर ठिकठाक आहे...( आता रोहित च्या चित्रपटात गाड्या नाही उडाल्या तर तो रोहीत चा चित्रपट वाटतच नाही डोळा मारा ) ६.५ फुट लांब आणि ४.५ फुट रुंद निकेतन नावाच्या दगडाशी फाईट करण्याचा विचारच अतिशयोक्ती आहे ... इथे तर होत आहे ...
तरी सुध्दा थोडेफार इमान राखुन ... एका फाईट मधे हवेत उडवणे .. एक लाथेत भिंतीचा चुरा करणे इत्यादी दक्षिणात्यछाप फाईट सिक्वेस्न ना दुर राखुन .. हिरो हाताला येईल त्या वस्तुने व्हिलन शी सामना करतो.. मग ते स्टोव असो या कोल्डड्रिंक च्या बाटल्या असो.. हातात दम नाही आपल्या हे वस्तुभान हिरोनी शेवट पर्यंत राखले आहे...
काहीकाही प्रसंग खुलवलेले आहेत.. गाण्यातुन संवाद साधण्याचा प्रसंग .. "मिन्नम्मा डोंट अंडरइस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन " सारखी पंचलाईन असो.. तसेच मिन्नम्माच्या स्वप्नाच्या प्रसंगातुन तिच्या मनावर " थंगबली" ची किती भिती बसलेली आहे हे दाखवले गेले आहे... चांगले प्रसंग लिहिण्याचा प्रयत्न दिसुन आला आहे.. दर वेळी राहुल त्यांच्या तावडीतुन सुटतो परंतु नशिब त्याला परत त्यांच्याकडे घेउन येतेच...

आता चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींकडे वळु :-
चित्रपटाचे लोकेशन्स मस्त आणि नाविन्यपुर्ण आहे.. आपल्या भारतात इतके सुंदर लोकेशन्स आहेत की त्या पुढे जगातले इतर ठिकाण सुध्दा फिके आणि ब्लॅक अँड व्हाईट वाटावे.. इतके सुंदर रंगसंगती ...ताजे तवटवितपणा... धबधबा तर निव्वळ अप्रतिमच... अक्षरश : दुधाचाच वाटतो इतका रम्य ... ओव्हरब्रिज असो या नदिवरुन / समुद्रावरुन रेल्वेचा ब्रिज असो... साधे साधे दृश्य देखील नयनरम्य वाटते... अगदी शेवटी रेल्वेचे टिकीट काढण्यासाठी ज्या स्टेशन वर जातात त्याच्या मागे सुंदर हिरवागार डोंगर आजुबाजुला बागबगिचा.. प्रेत्येक फ्रेम मधे निसर्गाचे देणे भरभरुन आहे ...सिनेमाटोग्राफर "डुड्ले" ने कॅमेराचा अप्रतिम वापर केलेला आहे.. ट्रेन वरुन चोहीबाजुने कॅमेरा ३६० डिग्रीमधे फिरवुन अँगल घेणे... या वरच्या ओव्हरब्रिज वरुन जीप जात असताना खाली असलेल्या ब्रिज वरुन ट्रेन त्याच वेळेला जाते ती टायमिंग ... मस्त घेतली आहे...
दिग्दर्शनात रोहीत त्याच्या नेहमीसारखा आहे... विनोद धमाल धुलाई...... या तिन शब्दांना त्याने पकडुन ठेवलेले आहे...
गाण्यात फारसा उल्लेखनिय कामगिरी यावेळी विशालशेखर कडुन झालेली नाहीच... "वन टु थ्री" सारखा ठेकेदार सुध्दा जास्त प्रभाव पाडत नाही..... त्यातल्या त्यात "तितली" आणि "तुझे ना छोडु" बरी झाली आहे...
चित्रपटातले सर्वात प्रभावी गाणे "लुंगी डांस" शेवटी येते.. मस्त डान्स आणि अफलातुन शब्द .. वर रजनीसर द बॉस... चारचांद वर एक चांद फ्री..... डोळा मारा
थोडक्यात
नो थिल्ल्लर पणा, नो अश्लिल गाणी, नो कपडे काढिंग अ‍ॅड बॉडी दाखविंग , नो ३र्ड क्लास डबल मिनिंग गाणी.
चित्रपट चालवण्यासाठी "शाहरुख चा उत्साह दिपिकाचा चार्म आनि रोहित ची अ‍ॅक्शन " च काफी आहे ...

"कोप्कर" - STORY

कोप्कर!!

सिरीया. 

सततच्या अतिरेकी कारवाया आणि प्रत्युत्तरादाखल होणार्‍या हवाई हल्ल्यांमुळे  बरीच शहरं ओस पडले आहे. हजारो कुटुंबे जीव मुठीत ठेवून सतत दहशतीखाली जीवन जगत आहे. नाटो आणि इतर देशांचे एकत्रित सैन्य विरुद्ध तिथले बंडखोर नेते, लोक यांच्यात सतत चकमकी होतात. बरीच वर्षे सिव्हिल वॉरच्या नावाखाली असंख्य आघात देश सहन करत आहे.  काही कडव्या अतिरेकी संघटनांनी या अस्थिरतेचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. तिथल्या काही स्थानिक नेत्यांना पाठिंबा देऊन आपली पाळेमुळे घट्ट रोवत, एकेक शहर काबीज करण्याचे काम जोमाने सुरू केले. संयुक्त राष्ट्रसंघाने धोका वेळीच ओळखून ही शहरे अतिरेकी आणि त्या नेत्यांच्या तावडीतून सोडवण्याकरिता आपले सैन्य पाठवले आहे.

अशाच असंख्य ऑपरेशन्सपैकी एक घटना-

इराक सीमेजवळ युफेरट्स नदीच्या किनारी वसलेले एकेकाळी समृद्ध असलेले शहर अल-मयादिन. १८ जानेवारी,  २०१५ शुक्रवार, सकाळचे सव्वासात वाजले आहेत. रात्रीपासूनच सुरू असलेली पावसाची रिमझिम. ढगाळ वातावरण. हवाई गस्ती चालू आहेत. शहरावरून घिरट्या घालणार्‍या हेलिकॉप्टर्सची घरघर अधूनमधून शांततेचा भंग करत. सार्जन्ट मेजर विल्यम्स याने एका इमारतीच्या गच्चीवर पोझिशन घेतली आहे. त्याचा साथीदार सार्जन्ट फिलिप गच्चीच्या दरवाजाजवळ पहार्‍यावर आहे. दोघे आपापल्या रिलिव्हर्सची वाट पाहत आहेत.

तेवढ्यात त्यांच्याजवळचा सॅटेलाईट फोन वाजतो. 

"ब्रावो २२३५ कमिंग."
"रॉजर दॅट,  सार्जन्ट ब्लॅककॅप. ओव्हर."
"सार्जन्ट२२३५,  कॅप्टन लोटस हिअर.  ओव्हर."
“कॉपी दॅट ओव्हर."
“सील्स वॉरहेड विल रिप्लेस युअर टीम ऍट एट ओ’क्लॉक.  ओव्हर."
"ओके,  टू-टू. आय रिपीट, ओव्हर."
" ब्रावो २२३५,  पोझिशन क्लिअर,  ओव्हर."
"35-40 नॉर्थ 40-27 ईस्ट ओव्हर"
"कॉपी दॅट ब्रावो. टू-फॉर अॅण्ड थ्री-फॉर इनफ़, ओव्हर"
"रॉजर,  इनफ़,  पोझिशन लॉटस"
"ब्रावो 2235,  जॉईन 534 अल्फा 45-46 नॉर्थ 40-32 ईस्ट. ओव्हर अॅण्ड आऊट"

फोन ठेवला जातो. विल्यम्स हातातली रायफल थोडी बाजूला करून फिलिपला आवाज देतो. फिलिप पायर्‍यांवर बसलेला असतो, तो आवाज ऐकून विल्यम्सजवळ येतो.
"सॅटेलाईटकॉल होता. आपल्याला रिप्लेस केले जाणार आहे"
"मरीन्स येत आहेत?” उत्सुकतेने फिलिप विचारतो.
"निगेटिव्ह. सील्स," शांतपणे विल्यम्स ने उत्तर दिले.
"सील्स?????” फिलिप आश्चर्याने ओरडतो. "ते कशाला येत आहे. इथे इतके काय महत्त्वाचे आहे.?
“काय माहीत, मला ही समजले नाही.. पण असेल काही"
“कशावरून?"
“नुसते सील्स नाहीत........ सील्स वॉरहेड येत आहेत. "
"व्हॉट............... तू नीट ऐकलेस?....... वॉरहेडच बोलले ना... " फिलिपचे डोळे विस्फारले. "नक्की काय चाललंय?"
"असेल काहीतरी... वॉरहेड आर लास्ट.” 
“येस.... काही अतिमहत्त्वाचे असल्याशिवाय ती टीम बाहेर पडत नाही.... "
“हो.... आता पर्यंत दोन महिन्यांत साडेतीनशे टार्गेट केले अस ऐकलं," नाखुशीने विल्यम्स म्हणाला.
“साडेतीनशे..?  जास्तच असतील, २१८ तर एकट्या मायकेलचेच आहेत. विचार कर अॅर्नॉल्ड,  रायनो,  विकी यांनी मिळून किती केले असतील..!! " फिलिपने वरची माहिती पुरवली.
"असतील जास्त! मला काय?" विल्यम्स आता रागातच बोलला.
“जास्तच.... कित्येकजण तर पॉइंट ब्लॅंक वर आहेत." फिलिप मुद्दाम खिजवण्याकरिता बोलला.
“बदल रे विषय..... मला त्या निळ्या छतवाल्या घरात गडबड वाटत आहे." रायफलच्या दुर्बिणीवरुन डोळा काढून विल्यम्स म्हणाला. खरंतर त्याने वॉरहेडमध्ये जाण्यासाठी फार प्रयत्न केले पण ऐनवेळेस मायकलची वर्णी लागल्याने त्याचे सिलेक्शन ब्रावो टीम मध्ये झाले.

“कुठे? सांग बरं," फिलिप आपली दुर्बीण सावरत म्हणाला.
“एट ओ’क्लॉक,  1059 मीटर,मेन रोड शॅडो हाउस.”
“@# ऑफ मॅन,  तुला आता मुलींमध्ये पण गडबड दिसतेय?... इतकी सुंदर आहे... तुला गडबड वाटली?“ फिलिप गंमतीने म्हणाला.
" तू मुलगीच बघ... मी काल संध्याकाळपासून त्या घराकडे लक्ष देतोय... गडबड वाटत आहे." विल्यम्स खेकसला. 
"तुला तर प्रत्येक मुलीतच गडबड वाटते..... मुलामध्ये वाटत नाही.... म्हणून मी आजकाल लांबच असतो.. हा हा हा"
“नालायका.... तुला मस्करी सुचतेय .. कालपासून २७ फोन केलेत तिने"
“हे जीझस.... तू इतके लक्ष ठेवून आहेस... असेल तिचा बॉयफ्रेंड यार... आजकाल हे देशदेखील आधुनिक झालेत.. कूल मॅन"
“नवरा घरात असताना ?"
“तू कुठे बघितलास?"
"काल गच्चीवर आलेला, पहिला फोन यायच्या आधी ... पण नंतर फोन आल्यावर आतच... परत आलाच नाही."
"फोन बॉयफ्रेंडचा असेल रे..... बोललो ना... बायकोवर संशय आला असेल. मग बसला असेल पहारा देत... तुला माहीत आहे का?  लोक काय काय करतात त्यासाठी... ऐक... "
"शटअप फिलिप... तुझे काम मी करतोय..... शूट करू की लक्ष देऊ..... तुला लक्ष ठेवायला सांगितले ना कॅप्टनने?"
“ १-२ पोजिशन्स असताना मी लक्ष देऊ की इमारतीवर पहारा देऊ? काय महत्त्वाचे?  तुला म्हणालो होतो. इथे २ -२ घे."
"ओके... ओके.... ते दोघे कुठे आहेत?"
"एक समोरच्या इमारतीच्या तळाशी... दुसरा आपल्या इमारतीच्या तळाशी"
"फाईन.......... पावणेआठ-आठला येतील ते..... आज सकाळपासून ते दिसलेच नाहीत,  घरात हालचालही दिसत नाही काही.... गेले असतील का ?"
"इट्स फ्रायडे ब्रो............ तू नवर्‍या पाहिलेस?
"इतके नीट नाही... ती खिडकी जवळ होती तेव्हा गच्चीवर हालचाल झाली म्हणून मी scope वर केली muzzle जड असल्याने लवकर हलत नाही. पुसटसे दर्शन झाले. दाढी होती. पण लोंबणारी नव्हती. साधारण हाईट असेल बहुधा."
"जाऊ दे. वॉरहेड बघून घेतील. आल्यावर सांग त्यांना"
"मला एक सांग विल्यम्स या दोघांना  देखील  घेऊन जायचे आहे? "
"का ? तुला काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी? "
"नाही तसे नाही.... आपण कसे एकाच देशाचे आहोत.. ते एशिअन आहेत"
"तुला त्यांच्या नावावरून प्रॉब्लेम आहे, असं सांग ना सरळ."
"असंच काहीसं... तुला समजलं ना?"
"एक लक्षात ठेव. भले त्यांचे देश एकमेकांविरुध्द लढतात परंतु इथे आपण अतिरेक्यांबरोबर लढत आहोत.. तेव्हा देश,  धर्म,  इत्यादी महत्त्वाचे ठरत नाहीत... ते दोघे दहशतवादाविरुद्ध एकत्र लढत आहेत.. शिक काही."
"हो रे... असेच आपले मनात आले आणि बोललो... जाऊ दे. काय म्हणते तुझी हिरॉईन."
"सकाळपासून तर कोणीच नाही दिसले, बहुधा उठले नसतील अजून."
"आठ वाजायला आले,  अजून आले नाहीत वॉरहेड."
"येतील रे... डिझर्टबॉय येईल इतक्यात."

थोड्याच वेळात खालून सुभेदार हनीफचा आवाज घुमला, "डिझर्टबॉय इज कमिंग." सगळे लगबगीने आवरू लागले. अवघ्या पाच मिनिटांत इमारतीखाली नाटोची "डिझर्टबॉय" हम्वी जीप पोहचली. दणदणीत खाटखाट बुटांचे आवाज येऊ लागले. क्षणभर हनिफला  मनुष्यरुपी चार दानवच अवतरले असे वाटले. स्वतः पठाण असून देखील त्याला धक्का बसला यावरूनच चौघांच्या ताकदीचा आणि देहयष्टीचा अंदाज यावा. सर्वांत पुढे वॅन अॅर्नॉल्ड,  त्याच्यामागे रोमन विकी, हेन्री रायनो आणि सर्वांत शेवटी डेव्हिड मायकल  वर पायर्‍या चढत होते. खाली सुभेदार हमीद आपला पार्टनर लेफ्टनंट अरुणला त्यांच्याबद्दल सांगायला लागला.
वर पोहचल्यावर थोड्या नाखुशीनेच विल्यम्सने मायकलचे स्वागत केले. स्वतःला हवे असणारे स्थान दुसऱ्या कोणी हिरावले आणि तोच नंतर बॉस म्हणून आला तर असे वाटणे साहजिकच आहे. अर्थात ते स्थान मायकलने स्वतःच्या मेहनतीच्या आणि अतुल्य कामगिरीच्या जोरावर मिळवले होते. मायकलला विल्यम्सच्या नाखुशीची कल्पना त्याच्याबरोबर ट्रेनिंग घेतानाच झाली होती. विल्यम्स जास्तीतजास्त नंबर मिळवण्यासाठी बर्‍याचवेळा मर्यादेबाहेर जाऊन कृती करायचा. साध्या हलणार्‍या टार्गेटला देखील  तो एकाच जागी सतत गोळ्या मारुन टार्गेटचे डोके,  हात उद्ध्वस्त करायचा. त्याला बऱ्याचदा मायकलने समजावले होते. पण विल्यम्सचे मत वेगळेच होते. "ही रायफल शत्रूला चिरडून टाकण्याकरिता मिळाली आहे." याच खुनशी वृत्तीमुळे सील्समध्ये त्याचे सिलेक्शन होता होता राहिले.

"हॅलो मेजर विल्यम्स,  काय सिच्युएशन आहे?"  मायकल हस्तांदोलन करीत बोलला.
"ठीक आहे, मेजर कमांड मायकल. फायरिंग अधूनमधून होत आहे. त्याच्याकडे रॉकेट लाँचर्ससारखी हत्यारे मोठ्या प्रमाणात आहेत .. अत्याधुनिक गन्स देखील आहेत."
"ह्म्म्म्म... तुझ्याबरोबर हा आहे....? " फिलिपच्या शरीरयष्टीकडे कटाक्ष टाकून अॅर्नॉल्ड पुटपुटला
"हॅलो.. मी सार्जन्ट फिलिप... ब्राव्हो२२३५.." अॅर्नॉल्डकडे हात पुढे करून फिलिप बोलला.
"तुझे सिलेक्शन कसे झाले फिलिप.. नशीब चांगले आहे माझ्या हातात नाही सापडलास!" अॅर्नॉल्डने हात जवळजवळ जोरात दाबलाच. फिलिप बिचारा कळवळला.
"सोड रे त्याला. जिथे जातोस तिथे ताकद दाखवायलाच हवी का.?"  रायनोने फिलिपपुढे हात केला. "याला मस्करी करायची जरा जास्तच सवय आहे तू मनावर घेऊ नकोस." मायकल विल्यम्सशी बोलता बोलता मध्येच म्हणाला.
"इट्स ओके..."  रायनोला हात न मिळवता फिलिपने चक्क भारतीय पध्दतीचा नमस्कार केला.
"हा काय प्रकार करतोय? " अॅर्नॉल्डसारखाच असणार्‍या रायनोने कुतूहलाने विचारले. "संगतीचा परिणाम.. आमच्या बरोबरचा लेफ्टनंट अरुण इंडियन आहे. ही इंडियन पध्दत आहे... अॅर्नॉल्डला भेटल्यावर यापध्दतीचे गुण मला कळले." फिलिप हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येऊन सगळेच हसू लागले.  तणावाच्या परिस्थितीत असे विरंगुळ्याचे क्षण क्वचितच मिळतात.

पाऊसाची रिपरिप अधून मधून चालू होती. वॉरहेडला त्या इमारतीसमोर  सोडून डिझर्टबॉय शहरात फ़ेरफ़टका मारायला गेलेली.  कुठूनही रॉकेटलाँचर ग्रेनेडने हल्ला होण्याची शक्यता असल्याने जीपला फ़ार तर वीसतीस सेकंदच थांबता येत असे. त्यामुळे ती परत आल्यावरच विल्यम्स आणि त्याच्या साथीदारांना निघता येणार होते.
रायनो आणि विकी आजूबाजूचे वातावरण आणि परिसर बघण्याकरीता निघाले.
अॅर्नॉल्डने गच्चीच्या दरवाज्याची बाजू सांभाळली. डेव्हिडला विल्यम्स त्याची पोझिशन दाखवत होता. सेंट्रल ब्लॉकच्या अगदी समोरच्याच टोकावर त्याने जागा निवडलेली. तिथून समोरचा संपूर्ण रस्ता, साधारण पाचशे मीटर तरी, सहज दिसत होता. लांबून एक मिलिटरी ताफा चारपाचवाहनांसह त्या रस्त्यावरून जात होता. नजर ठेवायला अशीच जागा वॉरहेड्सला या मिशनसाठी हवी होती. डेव्हिडने आपली स्नॅपरगन Barrett.50 Cal घेऊन पोझिशन घेतली. बाजूला विल्यम्स होता. बोलता बोलता सहज त्याने विषय काढला.

"डेव्हिड,  एक सांगायचे होते."
"बोल."
"समोरचे निळ्या छताचे घर 1059 मीटर 8 ओ’क्लॉक. तिथे मला गडबड वाटतेय."
"का?"
"विशेष असे काही नाही पण तिथे एक बाई, म्हणजे मुलगीच म्हण, फोनवर सतत बोलत होती. पण त्याआधी तिचा नवरा, बहुधा नवराच असेल, छतावर येऊन सतत आजूबाजूला नजर ठेवून होता. नंतर फोन आल्यानंतर त्याचे छतावर येणे बंद झाले. "
"कसा दिसत होता?" डेव्हिडने पटकन विचारले
"संध्याकाळची वेळ आणि पावसामुळे इतके क्लिअर दिसत नव्हते. लिन्गोनटाईप दाढी होती. केस ट्रिम केलेले होते. गोरा म्हणता येईल इतका उजळ होता."
"घरात अजून कोण आहे दोघांशिवाय?"
"माहीत नाही. दोघेच असतील. आणखी कोणी दिसले नाही. "
"कधीपासून?"
"काल संध्याकाळ पासून.. दुपारी तो माणूस दोनतीन वेळा छतावर आला. म्हणून लक्ष गेले. नंतर मी त्याच्यावरच लक्ष ठेवून होतो. संध्याकाळी सव्वासहाला ती मुलगी फ़ोनवर बोलताना खिडकीत दिसली. त्यानंतर तो माणूस वर आलाच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी पंधरावीस फोन आले."
"ठीक आहे. नंतर रायनोला टीम सोबत पाठवतो चेक करायला. फॅमिली असेल. बहुधा……….."

तेव्हड्यात झूम आवाजात दोन टोयोटा ट्रक वेगाने समोरच्या चौकातून अचानक उजव्या हाताला वळून खालून जाणार्‍या ताफ्याकडे येऊ लागले. त्यातल्या दोघांनी कारच्या दोन्ही बाजूने बाहेर येऊन बाजूच्या इमारतींवर आणि ताफ्यावर जोरदार फायरिंग चालू केली. गोळीबारामुळे ताफ़ा बरोबर इमारतीखाली थांबला. त्यातल्या सैनिकांनी पोझिशन्स घेतल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने डेव्हिडने गोळ्यांचा वर्षावापासून वाचण्यासाठी एकदम मागे धाव घेतली. विल्यम्सला देखील खेचून घेतले. फिलिप खाली पळाला. अॅर्नॉल्डने आडोसा घेतला होता. त्याने एकाला टार्गेट केले. गोळीची दिशा कळल्याने मागच्या गाडीतल्यांनी इमारतीच्या दिशेने तुफान गोळीबार सुरू केला. तो पर्यंत डेव्हिड छतावरच्या टाकीच्या शिडीवर पोहोचला. आपली बंदूक टाकीवर ठेवून त्याने पोझिशन घेतली. मागच्या गाडीतल्या ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्याला गोळी घातली.

"शूट दॅट ड्रायव्हर डेव्ही!" अॅर्नॉल्ड किंचाळला.
"आय ऍम ऑन इट"
स्स्स्सुप... विल्यम्स ने पुढच्या गाडीतल्या ड्रायव्हरला शूट केले. त्याबरोबर ती गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि बाजूला जाऊन आदळली. तिच्या मागचा ट्रक थोड्या अंतरावर थांबला. पहिल्या गाडीतून एक इसम रॉकेटलाँचर घेऊन बाहेर पडला. त्याने ताफ्यातल्या एका गाडीवर नेम धरला आणि रॉकेट सोडणार तोच डेव्हिड अचूक नेम  साधला. गोळी मानेतून आरपार गेली. पण तेवढ्यात त्या इसमाने ट्रिगर दाबल्याने रॉकेटची दिशा बदलली आणि ते इमारतीकडे वेगाने येऊ लागले.
"लाँचर कमिंग......... गो बॅक" डेव्हिड ओरडला. विल्यम्स आणि अॅर्नॉल्डनी  लगेच एकाबाजूला उडी मारली.
धूम............ कानठळ्या बसणाऱ्या आवाज घुमला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रॉकेट धडकले. पूर्ण सेंट्रलब्लॉक हदरले.
"कॅच एव्हरी #$%^. बिफोर दे नो स्नॅपर पोझिशन्स." अॅर्नॉल्डने हुकूम सोडला.
"येस डेव्हिड. टेक बॅक ट्रक"
डेव्हिडने मागच्या ट्रकच्या ड्राव्हरला ठार केले. त्यातील लोकांनी गाडीचा आडोसा घेऊन गोळीबार सुरू केला.
दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. इतक्यात जोरदार बॉम्बस्फोटासारखा आवाज होऊन त्या दोन्ही गाड्या हवेत उडाल्या. अचानक झालेल्या घडामोडीने सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहु लागले. 
गोळीबार बंद झाला. विल्यम्सचा रेडिओ वाजला.

"ब्राव्हो 2235. कमिंग ओव्हर."
विल्यम्स लगबगीने रेडिओकडे धावला. "ब्राव्हो 2235. ओव्हर."
"रायनो हिअर,  जॉब डन. स्टॉप फायरिंग. वी आर कमिंग"
डेव्हिडने हातातून रिसीव्हर घेतला "व्हाट द @#$ रायनो. ताबडतोब सेंट्रलब्लॉक जवळ ये. ओव्हर"
"हो. येतच होतो... ट्रुप्सला पुढे पाठव... मी चेकिंग करत करत येतोय."
विल्यम्स खाली निरोप द्यायला पळाला.. फिलिप्स वर आला.
"रायनो आणि विकी येत आहेत.. मी सार्जन्टस बरोबर आजूबाजूची घरे बघून येतो.. "
पंधरावीस मिनिटांनी रायनो आणि विकी वर गच्चीवर आले.
"काय? होता कुठे तुम्ही? .... लगेच येता येत नव्हते का?" अॅर्नॉल्ड बोलला.
"आम्ही आजूबाजूलाच होतो. समोरच्या चौकापर्यंत घरे वगैरे कशी आहेत बघायला गेलो होतो. तिथे आडोशाला बसल्यावर अचानक दोन ट्रक समोरून येताना दिसले. मी आणि विकी लगेच एका घरात घुसून लपलो. आणि संधी मिळताच गाडी खाली क्लेमोर लावले. धुडुम्म!!" रायनो हसतच म्हणाला.
"तरीपण... इथे आपण या कामाकरतात नाही आलोत... लक्षात...." डेव्हिड.
"ठीक आहे.. डिझर्टबॉय येईल आता. विल्यम्स, तयारीत रहा." डेव्हिडचे वाक्य मध्येच तोडत अॅर्नॉल्ड बोलला.
"अॅर्नॉल्ड मी काय म्हणतोय..." डेव्हिड त्याला बाजूला घेऊन गेला. "विल्यम्सला राहू दे. त्याला इथली जास्त माहिती आहे. आणि आपल्या मिशनच्या उपयोगी देखील येईल. "
"पण तुला माहितेय ना तो कसा आहे ते?  आपल्या मिशन मध्ये दुसऱ्याला इन्व्हॉल्व्ह करता येणार नाही."
"हो रे... मी फक्त माहितीसाठी ठेवतोय. आताच्या प्रकारातून त्याला असलेली इथली माहिती दिसून आली की नाही?"
"लोटसला कळव. ती तुझी जबाबदारी."
"ठीक आहे."

डेव्हिडने वायरलेसवरून हेडकमांडला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि विल्यम्सचे महत्त्व देखील समजावून सांगितले. हेडकमांडने सगळी माहिती नीट विचारून घेऊन मगच परवानगी दिली.
 सकाळचे दहा वाजायला आलेले. दोन तासांत बर्‍याच घडामोडी झाल्या. डेव्हिडने विल्यम्सला थांबवून घेतले आणि फिलिप्स त्याच्या अन्य दोन  साथिदारांसह डिझर्टबॉय मधून पाठवून दिले..... रायनोने टाकीवर पोझिशन घेतली,. तर विकी दक्षिणेकडच्या कोपर्‍यावर उभा राहिला.  मुख्य रस्त्याने शहरात येणारी वाहने तेथून स्पष्ट दिसू शकत होती.
अॅर्नॉल्ड डेव्हिड आणि विल्यम्स एकत्र खाली बसून रणनीती ठरवत होते. विल्यम्सला काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्याला थोडी माहिती देणे गरजेचे होते.
"विल्यम्स आता लक्ष देऊन ऐक.. आम्ही का आलो इथे... "
"ह्म्म बोल... "
"अल-मुहसान येथे सील्सने  अतिरेकी संघटनांचे काही म्होरके आणि त्यांचे समर्थन करणारे स्थानिक नेते यांना काल रात्री पकडले गेले आहे त्यांची मिटींग चालू असताना सील्सने छापा घातला. त्यांच्याकडून माहीती काढून घेणे चालू आहे पण त्यांना इथे ठेवणे धोक्याचे म्हणून इराकमध्ये घेऊन जाणार आहे. मरीन्सच्या माहितीप्रमाणे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. या एरिया मधे त्यांचे प्राबल्य जास्त आहे. त्यांचे बरेच स्लीपींग सेल्स  आहेत.. त्यांच्या हल्ल्याला निष्प्रभ करायची जबाबदारी आपल्यावर आहे."
"पण आपण फक्त चारपाच जणच आहोत?  हा सिनेमा नाही. आणखी सैनिक लागतील." विल्यम्स म्हणाला.
"हो आणखी तुकड्या येणार आहेत. ते आल्यावर त्यांच्या पोझिशन्स आपल्याला तयार करायच्या आहेत. म्हणून आम्ही लवकर आलो आहोत. रायनो- विकी, काय माहिती आणली आहे? सांगा बरं. अकरा वाजले आहेत. एक वाजेपर्यंत आपल्याला सगळं प्लॅन करून ठेवायचं आहे. पाच ते सहाच्या दरम्यान ऑपरेशन क्रॉसिंग इथून पासिंग होईल त्याआधी सगळी तयारी झाली पाहिजे." डेव्हिडने लगबगीने सगळे सामान बॅगेतून बाहेर काढले त्या भागाचा नकाशा बाहेर काढून समोर जमिनीवर पसरला. लॅपटॉप काढून आकडेमोड सुरू केली. रायनो-विकी मॅपसमोर येऊन बसले. रायनोने पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली.

"हा अल-दुरीन चौक आपल्या समोर पश्चिमला. त्याला छेदून जाणारा उत्तर-दक्षिण रस्ता. पश्चिमेकडून येणारा हा हायवे सरळ आपल्या इमारतीसमोरून जातो तो ठीक इराण सीमेपर्यंत. या डाव्या बाजूने इमारतीच्या पुढून जो रस्ता आत जातो पाचशे मीटरवर एक मशीद आहे. बंदच दिसतेय. एक मौलवी आहे, जो बांग देण्याचे काम करतो.
समोर खाली रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला आठशे मीटरवर सुपरमार्केट आहे. २हजार चौरस फ़ुटाचे तरी असेल. त्याच्या आतल्या  बाजूला जुनी दगडी घरं आहेत..... इथे." नकाशावर टिंब देत रायनो म्हणाला.
"आपल्याला पाच जागा निवडता येतील पूर्ण रस्ता कव्हर करण्याकरिता. जर जसा हल्ला दक्षिणेकडून ट्रक्स आलेत तोच धागा आपण पकडून पोझिशन्स ठेवत असू तर." विकीने पोझिशन्सवर खुणा करायला सुरुवात केली.

"त्या ट्रकमधले सगळे टार्गेट झाले का?" अॅर्नॉल्डने माहिती विचारली.
"हो. मागच्या ट्रकमध्ये चार होते आणि पुढच्यात तीन होते."
"कोणी सुटले नाही ना?  नाहीतर त्यांना आपल्या पोझिशन्स कळतील आणि मग ते त्याच प्रकारे हल्ला ठरवतील."
"नाही आम्ही जिथे होतो तिथून तरी कुणीच नाही" 
"ठीक आहे. कॅरी ऑन." अॅर्नॉल्ड विल्यम्सबरोबर पोझिशन्स घ्यायला निघून गेला.
"आपल्याला इथून या इमारतीवरून किमान बाराशे मीटर वेस्ट आणि एक हजार पन्नास मीटर ईस्ट्चा रोड-व्ह्यू मिळतोय.  आपले स्नॅपर एक चौकाच्या या दक्षिण टोकाला एक या तीनशे मीटर दूर आग्नेयेला दगडी घराच्या वर. आणि एक मागे सहाशे मीटरवर लाल घराजवळ. एक पाचशे मीटरवर मशिदीसमोरच्या इमारतीवर. दुसरा  सहाशे मीटरवर. आपल्या पूर्वेकडच्या मागच्या बाजूला. ओके?  पुढच्या चौकातल्या स्नायपरकडून उत्तरेकडचा रस्ता कव्हर होईल. आणि दक्षिणेकडेदेखील तिथूनच लक्ष ठेवायचे. तो पॉइंट पर्फेक्ट आहे.  दगडी घरावरून स्नॅपर  पहिल्या स्नॅपरच्या मागच्या बाजूवर लक्ष ठेवेल. तिथे आतून बरेच गल्लीबोळ  आहेत. चौकात यायच्या आधीच उतरून कोणी मागच्या बाजूने आले, तर त्यांना या घराच्या बाजूने जावे लागेल. तशीच परिस्थिती या उत्तर बाजूच्या मशीदीची आहे.    तिथून उतरून कोणी आतून आले तर मशिदीजवळून येणार आणि मला  तो एरिया बरोबर वाटत नाही.  तिथे उंच इमारती जास्त आहे कोणीही स्नॅपरवर लक्ष ठेवू शकतो म्हणून मला तिकडचा स्नायपर गच्चीवर असणे बरोबर वाटत नाही खाली पंधराव्या माळ्यावरच्या फ्लॅटमध्ये राहिलं. त्या इमारतीत कोपर्‍यावरच्या खोलीत दोन स्लाइडींग विंडोज आहेत......... हो बघून आलो मी."
"तेच विचारणार होतो." डेव्हिडने डोळा मारत विचारले.
"माझे काम पर्फेक्ट असते,  या बाजूने मागे त्या लाल घराजवळ जो स्नायपर असेल तो आपल्याला  साठ डिग्रीला असेल. आपल्या पूर्वेला असणार्‍या  बिल्डिंगमुळे गाडी पुढे गेल्यावर आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला पुढे जावे लागणार. त्यामुळे गाडीवर लक्ष ठेवण्याकरिता हा पॉइंट महत्त्वाचा आहे. आपल्या मागच्या पॉइंटवर असणारा एकशेऐंशी डिग्रीत लक्ष ठेवेल. त्याचा पॉइंट मशीद  ते लाल घराजवळचा स्नायपर आणि नंतर गाडी पुढे गेल्यावर त्याचा व्ह्यू त्यापुढच्या रस्त्यावर. इज दॅट क्लिअर?  एनी डाउट्स सार्जंट?" विकी म्हणाला.
"तू पिरॅमिड व्ह्यू बनवत आहेस विकी? "  डेव्हिडने लॅपटॉप मध्ये डाटा अपलोड करता करता आश्चर्याने विचारले.
"हो..." डोळे मिचकावत विकी मिश्किलपणे म्हणाला.
"ठीक आहे. कॅरी ऑन.. लक्षात ठेव  तू  आपल्याला पिरॅमिडच्या केंद्रस्थानी  ठेवले आहेस. अश्या वेळेला आपल्याला गरज पडल्यास लगेच कोपर्‍यात जाता येणार नाही. त्यासाठी तुला स्कोप ठेवायला लागेल." डेव्हिडने विकीला वेळीच सावध केले. विकीच्या लक्षात आले नव्हते की हल्ला झाल्यास सगळे एकदम अॅक्टिवेट होणार होते. अशावेळी सगळ्याबाजूंनी गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला तर कोणत्याही पॉइंटला अचानक मूव्ह होऊन ती जागा मोकळी करता येणार नव्हते. कारण पिरॅमिड व्ह्यू मध्ये प्रत्येकजण एकमेकांचा सपोर्टर असतो. मूव्ह होताना देखील फायरिंग थांबवायची ऑर्डर द्यावी लागते मग कोणत्या पॉइंटला ती द्यायची हा देखील प्रश्न उद्भवतो आणि  ती थांबली तर रिस्क जास्त असते. हाच मुद्दा डेव्हिडने विकीच्या लक्षात आणून दिला.  खरंतर विकी सारख्या अनुभवी  ऑनफिल्ड मॅपमेकरला हे लक्षात आलेच असते. रायनोला स्टारव्ह्यु हवा होता पण त्यासाठी कुमक पॉइंटवर जास्त खर्ची पडली असती. म्हणून तो व्ह्यू सोडावा लागला.
"अजून एक. प्रत्येक स्नायपरजवळ दोन-तीनची पोझिशन्स. दोघांपैकी एक वॉच ठेवणार आणि एक त्या जागेची सुरक्षा करणार आणि अपडेट देत राहणार. तीन जण त्या पॉइंटवर लक्ष ठेवणार." रायनो ने माहितीत भर टाकली.
"चला एक वाजला आता ट्रुप्स येतील. हे ऑपरेशन क्रॉसिंग आपण मरिन्स आणि सील्स संयुक्तरीत्या करणार आहोत. मरिन्सची एक बटालियन आपल्या मदतीला येत आहे. त्याचे नेतृत्व सेकंड लेफ्टनंट मायकल वेलास करणार आहे. सव्वाशे ते दीडशे सैनिक आपल्याला मिळतील अशी शक्यता आहे सेकंड लेफ्टनंट मायकल इथे आल्यानंतर मेजर अॅर्नॉल्ड त्याला ट्रुप्स हँडओव्हर करेल. अरेंजमेंट्स रायनो बघेल. विल्यम्स, रायनो आणो मी इथे असू. अॅर्नॉल्ड, तूसमोरच्या दगडी घराच्या पॉइंटवर आणि विकी लाल घराच्या पॉइंट वर.. एनी डाउट्स?" डेव्हिड लॅपटॉप बंद करून बोलला.

सॅटेलाईटफोन वाजला.
"वॉरहेड कमिंग. वॉरहेड कमिंग"
"रॉजर दॅट. मेजर कमांड डेव्हिड. ओव्हर"
"जनरल लॉट्स हिअर,  पोझिशन्स क्लिअर. ओव्हर"
"कॉपी दॅट,  35-40 नॉर्थ 40-27 ईस्ट. ओव्हर"
"ट्रूप्स इन्कमिंग विदिन 20 मिनिट्स,  मेजर मायकल  वेल्स कमांडिंग. ओव्हर"
"कॉपी,  आमची तयारी झाली आहे. स्नायपर बरोबर दोन-तीन पोझिशन्स बिल्ड,  ऑपरेशन कमांडर मेजर अॅर्नॉल्डच्या हातात आहे ओव्हर"
"गुड,  कॅरी ऑन,  नो सिव्हिल कॅज्युअल्टीज,  डोंट इंटरफ़िअर विथ पब्लिक अँड लोकल ट्रूप्स,  आपण इथे फक्त "ऑपरेशन क्रॉसिंग"साठीच आलो आहे. डु द जॉब  अँड मूव्ह बॅक. स्टे कनेक्टेड विथ मी. ओव्हर अँड आऊट."

थोड्याच वेळेत आर्मीच्या व्हॅन्स आणि हॅमर्स इमारतीजवळ उभ्या राहिल्यात. त्यातून मोजकेच सैनिक बाहेर पडले. त्यात मेजर मायकल देखील होता. अॅर्नॉल्ड आधीच खाली येऊन थांबलेला.
"वेलकम मेजर,  आय ऍम मेजर अॅर्नॉल्ड.. " मायकलशी हस्तांदोलन करत अॅर्नॉल्ड म्हणाला.
"हॅलो  मेजर.. जनरलने एक कंपनी पाठवली आहे अचानक इराकसीमेवर प्रॉब्लेम आल्यामुळे इथे मी फक्त ८० सार्जन्ट घेऊन आलो. वन ब्लॅकबर्ड इन एअर.  मला देखील परत जावे लागणार आहे. होप यू विल हँडल द सिचुएशन."
"ओन्ली एटी? नेव्हर माइंड मेजर. आम्हाला सवय आहे या प्रकाराची.. चला आपण वर जाऊन  पोझिशन्स बघून घेऊ." अॅर्नॉल्ड त्यांना गच्चीवर घेऊन आला. वरती सगळ्यांनी आपापले परिचय दिले. अॅर्नॉल्डने ही माहिती लागलीच दिली की आपल्याला सव्वाशे ऐवजी ऐंशीच सैनिक दिले आहेत. काय आणि कोणत्या प्रकारचे सैन्य आणि हत्यारे आहेत आणि मेजर मायकल देखील आपल्या बरोबर नाही. हे कळल्यावर  कुणाला ही आश्चर्याचा धक्का बसला नाही जणू काही हे रोजचेच होते. युद्धकाळात अचानक काहीही घडू शकते अशामुळे अशी लवचिकात ठेवावीच लागते. रायनोने  मॅप उघडून बोलायला सुरुवात केली.
"ठीक आहे आपल्याकडे ऐंशी आहेत. त्यातले बहुतांशी ग्रेनेड आणि मशीनगन्स ट्रूप्स आहेत. स्नायपर्सची एक टीम आहे. पावणेदोन वाजले आहेत. आम्ही पाच पॉईंटवर एक-एक स्नायपर आणि २-३ ची अरेंजमेंट्स ठरवली आहे  मेजर मायकल मला तुमच्या टीम मधले तीन स्नायपर हवेत."
"सार्जन्टस अल्बन, सॅमी,जॉर्जी,  रुसलान,  अॅल्विन,  दिमित्री,  तात्सुओ हे सात स्नायपर आहेत तुम्ही निवडा. ऑल आर इक्वल्स"
"ह्म्म्म्म दिमित्री, तात्सुओ, जॉर्जी... दिमित्री चेकपॉईंट सुपरमार्केट,  तात्सुओ मशीद पॉइंट आणि जॉर्जी हा आपल्या मागचा पॉइंट क्लिअर?  राहिलेले अल्बन विकीबरोबर,  सॅमी अॅर्नॉल्ड बरोबर"
"दिमित्रीबरोबर आणखी एक जोड. एक साऊथ वर आणि एक नॉर्थवर लक्ष ठेवेल." विकी म्हणाला.
"बरोबर. मग रुसलान दिमित्रीबरोबर आणि अॅल्विन तात्सुओ बरोबर राहील."
"माझ्याबरोबर स्नायपर??  मला नाही वाटत रायनो तिथे दोघेतिघे हवेत. सॅमीला जॉर्जीबरोबर ठेव. त्याचा कव्हर एरिया मोठा आहे. मला फक्त  दिमित्रीची मागचीच बाजू सांभाळायची आहे. "
"अॅर्नॉल्ड वॉज राईट रायनो." डेव्हिडने सांगितले.
"ओके बॉस पोझिशन्स क्लिअर... लेट्स अपडेट डाटा टू ब्लॅकबर्ड. दे गिव्ह अस मुव्ह्स" रायनोने वर आकाशात त्यांच्या जवळ येणार्‍या हेलिकॉप्टराकडे बोट दाखवले.
"दोन वाजलेत.  स्नायपर्सना पोझिशन्सवर पोहचवा. मेजर मायकल, तुम्ही सैन्य त्या त्या ठिकाणी पेरायला सुरू करा,  विल्यम्स तू यांच्यासोबत जा आणि परत आल्यावर पकडलेल्या लोकांची तपासणी रायनो बरोबर कर. बत्तीस सार्जन्ट्स पोझिशन्स वर आणि अठ्ठेचाळीस सार्जन्ट्स फील्डवर.  रायनो तू इथे थांबून ब्लॅकबर्ड्शी को-ऑर्डिनेट कर. मी या सार्जंन्ट्सना घेऊन आठशे मीटरच्या सर्कलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करतो. पाचच्या आत आपल्याला एरिया क्लीअर करून घ्यायचा आहे."  डेव्हिडने हुकूम सोडला.

मायकल आणि विल्यम्स आपापल्या गन्स घेऊन त्यांच्या सार्जन्ट्सना पॉइंट्सशी घेऊन जायला निघाले. दोन व्हॅन्स आणि तीन हॅमर त्यांच्या सोबत निघाल्या. अॅर्नॉल्ड आणि विकी साथिदारांसहीत रस्त्याच्या बाजूने गल्लीबोळातून लपत कुणालाही सुगावा न लागू देता आपल्या पॉइंट्सकडे निघाले. डेव्हिडने आपल्या साथीदारांचे दहादहाचे चार गट केले.
"सार्जंन्टस, मी मेजर कमांडर डेव्हिड तुमचे नेतृत्व करणार आहे.. ऑपरेशन क्रॉसिंग काही वेळात सुरू होईल. त्या आधी आपल्याला आठशे मीटर परिघातला एरिया चेक करून घ्यायचा आहे. प्रत्येक घर, प्रत्येक इमारत, त्यातले रहिवासी, सगळ्यांची तपासणी करायची. कुणावर संशय आला तर लगेच त्याला बाहेर काढून सेंट्रलब्लॉक जवळ आणायचे. आठ जण इथेच राहतील पकडून आणलेल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता. इथे आल्यावर त्यांची कसून तपासणी करा. त्यांचे फिंगरप्रिंट्स, फोटो घ्या. सगळ्यांना इथे आणल्यावर विल्यम्स आणि रायनो  तपासणी करतील. मेजर रायनो वर आहे त्यांच्याची संपर्क साधून डेटाबेसमध्ये तपासा. आपल्याला हवे असलेल्या लोकांमध्ये यांच्यापैकी कोणी आहे का? एकही संशयित तपासणी न करता जाऊ नये. बायका- मुलांना त्रास देऊ नका. त्यांची बसण्याची सोय वेगळ्या फ्लॅट्स मधे करा. आणि नो सिव्हिल किलिंग हे लक्षात राहू द्या. आपल्याला इथे केवळ ऑपरेशनसाठीच बोलवले आहे. त्यांच्या रोजच्या कामांमध्ये हस्तक्षेप करू नका. लोकल पोलिस, इत्यादींच्या भानगडीत पाडू नका.. काही गडबड असेल तर समोरून गोळी आल्याशिवाय ओपन फायर करू नका. शक्यतो स्नायपर्सना टार्गेट लेसर द्या. इथले लोकं आपले शत्रू नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर?  नाउ टीम ए  तुम्हाला 35°01'13.9"N 40°27'25.5"E मशीद एरीया ते 35°01'02.4"N 40°27'35.6"E या इमारतीच्या मागे चर्चपर्यंत शोधायचा आहे.. टीम बी तुम्हाला 35°01'11.4"N40°27'00.9"E दगडी घरापासून ते 35°00'57.9"N 40°27'13.9"E लालघर  एरिआ शोधायचा आहे. टीम सी तुम्हाला 35°01'23.1"N 40°27'06.4"E हा चौकसभोवतालचा एरिया बघायचा आहे. आणि टीम डी तुम्ही माझ्याबरोबर असाल आपल्याला हा पूर्ण रस्ता क्लीअर करायचा आहे. टीमलिडर्स काही ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी सैन्य ठेवू शकतात. एनी डाउट्स ?  लेट्स मूव्ह सार्जंट्स"

पाठीला आपली स्नायपर Barrett.50 Cal अडकवून आणि  हातात एम२७ रायफल घेऊन डेव्हिड टीम बरोबर पुढे झाला.  तो पर्यंत बाकीच्या टीम्स आपापल्या ठिकाणी निघाल्या. सर्च ऑपरेशनमध्ये एक सार्जंट घराचा दरवाजा धक्का मारून उघडतो तर दुसरा एका बाजूने आत घुसण्याच्या तयारीत असतो त्याचबरोबर आतून कोणी हल्ला करू नये म्हणून दारासमोर जरा दूर अजून एक सैनिक तयारीतच असे. आत गेल्यावर सगळ्या लोकांना एकत्र करणे ओळखपत्रे तपासणे चालू होते. कुणाच्या घरात जबरदस्ती घुसणे हे डेव्हिडचे नावडते काम. पण नाइलाजाने करावेच लागत होते.  एकेक करून घरात-इमारतीत घुसून तपासणी करणे चालू होते. ज्यांच्या कागदपत्रांमध्ये गडबड वाटत होती त्यांना सेंट्रलब्लॉकजवळ आणले जात होते. डेव्हिड आणि सहकारी एका इमारतीत गेल्यावर तपासणी करत असताना दोन व्यक्ती काहीशा संशयास्पद वाटल्या.


"सर, यांच्या घराची तपासणी करत असताना आतल्या पलंगाखाली पाचशे डॉलर्स आणि ही हत्यारे सापडलीत आणि काही सुकामेवा देखील सापडला."
एका सार्जंट्ने डेव्हिडला माहिती पुरवली.
"हत्यारे कोणत्या प्रकारची? "
"सर एक लोकल रिव्हॉल्वर आहे. आणि दुसरी पिस्तूल आहे ९एमएम"
"9 एमएम अरे व्वा. घेऊन या त्याला"
बाहेर एक उंचापुरा  काळा पहाड म्हणता येईल असा पुरुष आणि उंच पण वयाने लहान असा आणखी एक. दोघांना   हातकड्यांनी हात मागे  बांधून आणण्यात आले
"तुमची नाव काय आहेत" उंच काळ्यापहाडला बघून डेव्हिड म्हणाला.
"महल्लविद दहान्ना सीन्ना? "
"ट्रान्सलेटरला बोलवा यार; इथे हीच समस्या आहे."
सिरीयामध्ये मुख्यतः: अरबी भाषा असल्याने  सैनिकांना ट्रान्सलेटर सोबत घ्यावा लागतो. संभाषण करताना बर्‍याचवेळा उपयोगी पडतो. सुलेमान रशीद हा त्यांच्याबरोबर ट्रान्स्लेटर म्हणून होता. तोच पुढे आला.
" म्ला अस्युम्मुकी? "
" तुस्सुम्मी युसुफ बेन ,  तस्समुहु अकिल मलिक"
"याचे नाव युसुफ बेन आणि त्याचे अकिल मलिक." सुलेमानने माहिती पुरवली.
"हे पैसे आणि हत्यारे घेऊन इथे काय करत होतात, विचार त्यांना."
"ते म्हणत आहेत की ते लेबनान मधून आलेत आणि स्वसंरक्षणाकरिता हत्यारे आहेत. त्यांचे नातेवाईक इथे सिरीयात राहतात, महकन मध्ये"
"लायसेन्स आहेत का"
"नाही इथल्या परिस्थितीमुळे  लेबनान सीमेजवळूनच एका लोकल माणसांकडून घेतली होती. "
"आत थांबवा यांना आणि घराची अजून तपासणी करा. विचारपूस चालूच ठेवा.. मी रस्त्याची तपासणी करून आलो."

सार्जन्ट सुलेमानकडे सूत्रे सोपवून डेव्हिड बाहेर पुढील तपासणीकरिता निघाला. सुलेमानने  बरेच उलटेसुलटे प्रश्न विचारले. त्यांच्याकडे असणार्‍या वॉन्टेड अतिरेक्यांचे फोटो दाखवून काही ओळख आहे का वगैरे तपास चालू केला. इकडे डेव्हिडने देखील रस्त्यावरची तपासणी वेगात  सुरू केली होती. तपासणी करत करत चार वाजायला आले. चौकातून परत येत असताना सॅटेलाईट फोन वाजला.
"वॉरहेड कमिंग वॉरहेड."
"मेजर कमांडर डेव्हिड कमिंग ओव्हर."
"ब्लॅकबर्ड हिअर,  नवीन अपडेट्स आली आहेत. बघून कन्फर्म करा ओव्हर."
"कॉपी दॅट,  चेक करून माहिती पुढे पाठवतो. ओव्हर अँड आऊट."
डेव्हिडने लॅपटॉप उघडून त्यावर आलेली माहिती बघायला सुरुवात केली. आजच्या मिशन मधली माहिती अपडेट करण्यात आली होती.  तसेच आणखी काही चेहर्‍यांची ओळख पाठवली होती. त्यातल्या तीनचार जणांचे फोटो बघून डेव्हिडला हसू आले. आणि तो इमारतीच्या दिशेने चालू लागला.

काही वेळेतच डेव्हिड आणि चमू इमारती जवळ आले. डेव्हिड जिना चढून फ्लॅटजवळ पोहचला. बाहेर तीनचार सैनिक होते. त्यांचा सॅल्यूट घेऊन डेव्हिड रूममध्ये शिरला. दोघांना खुर्चीवर बसवले होते. एका बाजूला सोफ्यावर सुलेमान बसलेला आणि त्यांच्या भोवती चारपाच सैनिक उभे होते. सुलेमान शांतपणे त्यांना अरबी भाषेत प्रश्न विचारत होता. डेव्हिड  खुर्ची घेऊन समोर बसला. सुलेमान उभा राहिला पण त्याला हातानेच खाली बसवले.
"सुलेमान,  काय प्रोग्रेस?
" काही नाही सर,  हा युसुफ लेबनान मधून आलेला आहे म्हणतोय. चोरीच्या तेलाचा व्यवसाय आहे. त्यासाठीच नातेवाइकाला घ्यायला आलेला. विहिरीतून काढलेले तेलाचे ड्रम गोडाउन मधून परस्पर उचलतात. म्हणून त्यासाठी हत्यारे जवळ ठेवावी लागतात. स्थानिक ओळखीचा जवळ असावा म्हणून नातेवाइकाला मदतीला घेतलाय." 
"अस्स. तेल चोरी करत.... " अचानक बोलता बोलता डेव्हिडने अकिलच्या कानफाडात वाजवली. अकिल अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धडपडत खुर्चीसकट मागे पडला. डेव्हिड शांतपणे उठून त्याच्याजवळ गेला. त्याला आधार देऊन विचारले "तेलचोरी करतो काय? "  अकिलचे केस पकडून डोके वर उचलून परत खाली आदळले

"सर काय झाले?" सुलेमान आश्चर्य चकित झाला.
"................ " डेव्हिडने  सुलेमानकडे बघून शांत राहण्याचा इशारा केला. अकिलला उचलून परत समोरच्या भिंतीवर आदळला. तीन-चार कानफाडात वाजवून शांतपणे परत विचारले "तेल चोरी करू नये कळते का तुला"? "
अकिल विव्हळत होता. "महह्मा महह्मा" बोलत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून डेव्हिडने बाजूला असलेली लाकडी खुर्ची त्याच्या पाठीवर खाड् करून मारली. एक- दोन- तिसर्‍या फ़टक्याला खुर्ची  तुटली.
"तेल चोरणार का परत?" आता डेव्हिडने त्याला  खाली बसवले. अकिलच्या डोक्यातून रक्त वाहत होते. समोरचे दात तुटल्यातच जमा होते. त्याला बसायला त्रास होत होता. डेव्हिड परत खुर्ची  घेऊन अकीलसमोर बसला. चेहर्‍यावरचा क्रूरपण जाऊन हसरेपणा आला. अकिलच्या डोक्यावरून हात फिरवून परत एकदा विचारले. "चोरी किती वाईट असते कळले ना? " अकिलचा साथीदार युसुफ आदिल डोळे फाडून डेव्हिड कडे बघत होता. सुलेमानच्या डोळ्यांत देखील भय दाटून आले होते. आता पर्यंत त्याने वॉरहेड  आणि त्यांच्या कारनाम्यांबद्दल फक्त ऐकले होते. आज त्याच्या समोर खुद्द वॉरहेडचा मेंबरच बसलेला होता. डेव्हिडने एक हसरा कटाक्ष युसुफकडे टाकला आणि अकिलचा एक हात स्वतःच्या मांडीवर ठेवला. खिशातून स्वीसनाईफ काढली. सावकाशपणे उघडून त्यातली पकड असलेला पार्ट काढला.
"अकिल, तेल चोरू नये. बहुधा हे तुला आता चांगलेच कळले असेल. बरोबर ना? "
"महह्मा मह्ह्मा," अकिलची स्थिती फारच केविलवाणी झालेली. अठरावीस वयाचा असेल अकिल. पहिल्यांदा इमारतीमध्ये येताना जेव्हा डेव्हिडला बघितलेला तेव्हा शांत  हसमुख, फारच सालस वाटणारा मनुष्य अचानक सैतानासारखा हिंस्र होईल असे त्याला स्वप्नात देखील वाटले नसते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू  आणि भीती निरंतर वाहत होते. डेव्हिडच्या चेहरा परत पहिल्यासारखा शांत हसमुख झाला. अकिलचा हात हातात घेऊन पकड त्याच्या करंगळीच्या नखावर पकडली. आणि अचानक एका झटक्यात त्याचे नख करंगळीपासून दूर केले.  अकिलची  किंकाळी रूम मध्ये घुमली.
"अल्लाआऽऽऽऽ " किंकाळीसरशी युसुफ नखशिखान्त हादरला. लटपटू लागला. डेव्हिडच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब होऊन पुन्हा एकदा सैतानाचा चेहरा अकिलला दिसू लागला. डेव्हिडच्या पायावर डोके ठेवण्याचा प्रयत्न केला पण डेव्हिडने त्याचा हात तसाच पकडून ठेवलेला. आता अनामिकेची पाळी होती.
""अल्लाआऽऽऽऽ... " परत एक किंकाळी रूम मध्ये ऐकू आली. आता सुलेमान अस्वस्थ होऊ लागला. क्रूरपणा त्याने देखील बघितलेला  आणि केलेला देखील. पण या क्रूरपणामागेचे कारण काहीच कळेनासे होते. दुसरीकडे युसुफची अवस्था सुलेमानपेक्षाही वाईट होती. भीतीने बोबडी वळली होती आणि अकिलचे बघून स्वतःची मूठ आवळून घट्ट ठेवण्याचा सतत प्रयत्न करत होता. डेव्हिडने आपली नजर युसुफकडे वळवली त्याची अवस्था बघून त्याला हसू आले. अजून एक बोटाचे नख उखडल्यानंतर डेव्हिडने अकिलला दूर लोटले. अकिल हळूहळू वेदनेने बेशुद्ध होऊ लागलेला. डेव्हिडने पाण्याचा जग मागवला आणि त्यात रक्ताळलेली स्विसनाईफ शांतपणे धुऊन स्वच्छ केली. थोडे पाणी अकिलच्या तोंडावर टाकून त्याला शुद्धीवर आणले. खिशातून एक पेनकिलरची गोळी काढून अकिलच्या तोंडात टाकली आणि पाणी पाजले
"लहान मुलांना असल्या कामावर लावू नयेच. साफ़ चुकीचे असते ते," युसुफकडे बघून डेव्हिड सुलेमानशी बोलू लागला.
"पण सर, कळू शकेल झाले काय ते?" सुलेमानने भीतभीतच विचारले.
"अरे!  कोवळ्या वयाच्या मुलांना कोणी कामावर लावतात का? मला अजिबात आवडत नाही. पण या लोकांनी खुदा के  बंदे देखील धंद्यावर लावले. " अर्धवट शुद्धीत असलेल्या अकिलला उचलून त्याने सोफ्यावर बसवले.
"सांग युसुफ, तेल कुठून चोरणार होतास?" अचानक युसुफकडे बघून डेव्हिड शांतपणे बोलला.
"दाख्ख-अल..." सवयीप्रमाणे  सुलेमान ट्रान्सलेट करायला लागला पण डेव्हिडने थांबवले. सुलेमानच्या चेहर्‍यावर भूत दिसल्यासारखे भाव उमटले.
"युसुफ मी तुला विचारतोय तेल कुठून चोरणार होतास?" युसुफकडून काहीच उत्तर आले नाही तेव्हा डेव्हिड उठला आणि खोलीत फ़ेर्‍या मारू लागला. युसुफ त्याच्याकडे वेड्यासारखा पाहू लागला. फिरता फिरता डेव्हिडने सिगार खिशातून काढला. सिगारकटरने मागील भाग कट करून शांतपणे सिगार सुलगावली. कटरशी खेळत खेळत घड्याळात पाहिले. साडेचार वाजले होते. एव्हाना सगळे स्नायपर आपापल्या जागी पोहचले होते. बर्‍याच टीमची सर्च ऑपरेशन्स संपत आली असतील. संशयितांची तपासणी रायनो आणि विल्यम्स करणार असल्याने डेव्हिडकडे तसा बराच वेळ होता. दहा मिनिटे फिरून झाल्यावर डेव्हिड थांबला आणि युसुफकडे वळला. तीनचार पावलांतच युसुफ जवळ पोहचला.....

एक किंकाळी आणि युसुफच्या उजव्या हाताच्या पंजातून रक्ताची धार वाहू लागली. त्याच्या उजव्या हाताची तर्जनी सिगारकटरने उडवली होती. युसुफच्या चेहऱ्यावर राग,  वेदना दिसू लागल्या. श्वास जोरजोरात चालू होता. दातांखाली ओठ दाबून तो वेदना सहन करण्याचा प्रयत्न केला. पण निष्फळ ठरला. कारण सिगारकटर आता रक्ताला चटावलेला होता...
"युसुफ तेल कुठून चोरी करणार होतास सांगतोस की? "
"अश्फाक सालेमने पाठवले. अश्फाक सालेम ने कामगिरी दिली आहे" युसुफ तिसरे बोट उडवल्यानंतर किंचाळला. युसुफला इंग्लिशमध्ये बोलताना बघून सुलेमान  तोंडात बोटच घालायचे बाकी होता.
"तरीच अजून पर्यंत तुझे तोंड बंद होते.. अश्फाककडे कामगिरी सोपवली आहे. सांग आता नीट."
"माझ्या पोराला जाऊ द्या. तो नाही यात सामील," अकिलकडे बघून युसुफ दयनिय नजरेने म्हणाला.
"नक्कीच,  जर तू मला सांगितले तर. नाहीतर... " कटरचा आवाज करत डेव्हिड म्हणाला.
"तू नक्कीच नरकात जाशील ह$%^&.. "
"हो आणि मला तोच हवा आहे. कारण या मार्गावर चालून तुम्हाला जन्नत नशीब होणार आणि  तुझ्यासारख्याबरोबर मला जन्नत वाटून घ्यायची नाही... मी आपला नरकातच बरा." डेव्हिडने हसत उत्तर दिले. "आता बोल लवकर"
" अश्फाकचा स्लिपिंगसेल अॅक्टिवेट झाला आहे. त्या नेत्यांना हल्ला करून सोडवायचा बेत आहे. त्यांच्या जोडीला स्लिपिंग सेल्सची फोर्स देखील आहे. तेल म्हणजे नेते म्हणून तेलाची चोरी असा कोड होता "
"आम्ही इथे असताना देखील हल्ला होणार? "
"हो... तीनचार दिवस झाले. याची पुरेपूर तयारी चालू आहे.. "
"आणि हमला विफल झाला तर...? "
",,,,,,,, "
सुलेमानने डेव्हिडकडे पाहिले. युसुफ हसू लागला होता.
"हल्ला आम्ही विफल करणारच तेव्हा काय? "
"आमच्याबरोबर आमचा देव आहे; आम्ही निष्फळ होऊच शकत नाही"
डेव्हिडने झटक्यात पिस्तूल काढले आणि अकिलच्या पायावर गोळी झाडली.. ठ्ठो...
"अल्लाऽऽ अम्मीऽऽ "
"ह$%^&,  मा$%^& सैतानाची अवलाद आहेस तू. "
"हल्ला विफल झाला तर युसुफ?" पिस्तुलीची नळी आता अकिलच्या दुसर्या पायाकडे वळली.
"नाहीऽऽ. हल्ला विफल झाला तर किंवा तसे वाटू लागले तर मी आणि फ्रंट्लाईन३ हे स्लिपरसेलला संदेश पाठवणार होतो की "कोक्पर"ला तयार करा म्हणून"
"कोक्पर ?  हे काय आहे युसुफ?" डेव्हिड किंचाळला. पण उशीर झालेला. अकिलच्या पायाच्या दिशेने झाडलेली गोळी युसुफने अचानक मूव्ह होऊन मध्ये येऊन डोक्यावर झेलली. कवटीची शकले उडाली. सुलेमान जागच्या जागीच उडाला. युसुफने योजना सांगण्याआधीच आत्मघात केला होता. 
"सर.. "कोक्पर" काय आहे हे कळायला हवे होते. " सुलेमान हताश होऊन म्हणाला.
"कळेल आपल्याला.. सध्या आपल्यावर हल्ला होणार आहे हे नक्की आहे. इतकी तर माहिती  आपल्याला मिळाली. हल्ला निष्फळ झाला तरच कोक्पर ना?  त्यासाठी आपल्याला हल्ला निष्फळ करायला हवा... " बोलता बोलता तो उभा राहिला आणि त्याने अकिलच्या डोक्यात शांतपणे गोळी घातली. सुलेमान बघतच बसला.

"सर हा तर... "
"युसुफ पेक्षा खतरनाक अतिरेकी आहे. बाराव्या वर्षीच याने ओलीस ठेवलेल्या पत्रकाराचा शिरच्छेद केलेला. इथे येताना माझ्याकडे अपडेटेड माहिती आली होती. त्यात युसुफ आणि अकिलची माहिती होती. मगाशी जो हल्ला झाला त्या जीपमधूनच हे दोघे आले होते असा माझा संशय आहे. कारण त्या जीप मधल्या एकदोघांचे फोटो मी हेडक्वार्टरला पाठवले होते. हे दोघे त्यांच्याच टीम मध्ये असतात अशी माहिती मिळाली. आणि युसुफला कितीही टॉर्चर केले तरी तो तोंड उघडणार नाही म्हणून अकिलला टार्गेट केले. फोटो काढलेले का? घराची सगळी तपासणी झाली? "
"हो सर," बाजूला उभा असणार्‍या सार्जंटने सांगितले.
"मग वाट कसली बघताय? उचला यांना; खाली घेऊन चला. " चार सार्जंट्सनी दोन्ही मृतदेह खाली आणले.
डेव्हिडच्या इशार्‍यावर एका सार्जंटने  जीपमधला पेट्रोलचा एक्स्ट्रा कॅन आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकले आणि डेव्हिडने तोंडातला सिगार त्यांच्यावर फेकून दिला.
"यांचे काम संपले आणि आपले देखील. नो नीड टू टेक केअर. मूव्ह सार्जंट्स." डेव्हिडने वॉकीटॉकी काढून अॅर्नॉल्डला कॉन्टॅक्ट केला.

"कमिंग विल्यम्स कमिंग."
"रॉजर."
"नवीन अपडेट आले आहे. त्यातले दोन जण दगडी घराच्या पुढच्या इमारतीत मिळाले. काही माहितीही हाती लागली आहे. सेंटरब्लॉक वर या लगेच. ओव्हर"
"ठीक आहे. मी पोचतोच. ओव्हर अँड आऊट."
डेव्हिड जीपने इमारतीकडे निघाला. रायनो तिथेच असणार  होता. फक्त  विल्यम्स पोहचला की नाही माहीत नव्हते. तो इथे आधीपासून असल्याने काही माहिती असण्याची शक्यता जास्त होती.
सहा मिनिटांत डेव्हिड इमारतीशी पोहचला.  दहा-बारा लोकांना पकडून वरच्या मजल्यावर घेऊन जात होते.. रायनो आणि विल्यम्स नुकतेच पोहचत होते. डेव्हिडने लॅपटॉप काढून नव्याने आलेली माहिती त्यांच्या टॅब्सवर पाठवली.
"विल्यम्स ही नवीन माहिती आली आहे; त्यातले दोन मला सापडले. बाकीचे बघ यांच्यात काही आहेत का? यांनी त्यातल्या कोणाला पाहिले आहे का?"
"ठीक आहे.. मी इथे चेक करतो. मेजर मायकल निघालाय."
" हंऽऽ ठीक आहे. इन्फॉर्मेशन आहे की या नेत्यांना सोडवण्याचा जोरदार प्रयत्न होणार आहे आणि त्यांना माहीत आहे आपण इथे आहोत"
"तरी देखील? " रायनो म्हणाला
"हो... तरी देखील आपण वर डिस्कस करू. मला लॉटस यांनापण  सांगायचे आहे. चल लवकर"
रायनो आणि डेव्हिड वर निघाले. अचानक थांबत डेव्हिड म्हणाला, "विल्यम्स तुला ’कोक्पर’  काय आहे, माहीत आहे?? "
" ’कोक्पर’?  शब्द ऐकलेला नाही.  कशाबद्दल आहे? "
"तेच शोधायचे आहे. तू तुझ्या ओळखीतल्यांना विचार. मला उत्तर हवेच." डेव्हिड गच्चीवर पोहचून जनरलला सॅटेलाईट फ़ोन लावला. विलिअम्स खालीच थांबून राहिला.
"कमिंग लॉट्स कमिंग ओव्हर"
"रॉजर लॉट्स ओव्हर"
"सर मला अपडेट्स मिळाले. त्यानुसार मला दगडी घराच्या मागच्या इमारतीमध्ये युसुफ आणि अकिल सापडले. मघाच्या हल्ल्यातूनच ते आले होते असे दिसते. जैश लिबरेशनचा म्होरक्या अश्फाकने तो हल्ला केला होता आणि त्या नेत्यांना सोडवण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्यांना माहीत आहे आम्ही इथे आहोत. तरी ते हल्ला करणार आहे. ओव्हर. "
"त्यांच्याकडून काय मिळाले. काही नकाशे वगैरे?  ओव्हर"
"नाही फक्त दोन बंदुका आणि काही पैसे. त्यांचे काम फक्त मेसेज पोहचवण्याचा होते... ओव्हर"
"कसले मेसेज? ओव्हर"
"हल्ला निष्फळ झाला तर कोक्परला तयार करण्याचे सांगायचे होते. ओव्हर."
"कोक्पर??  कुणाला सांगणार होता? ओव्हर."
"तेच विचारत होतो. पण त्याने आत्मघाती प्रकार केला. ओव्हर"
"घाई केलीस वॉरहेड. लक्षात ठेवायला हवे होते की तो फिदायीन पथकाचा सदस्य आहे. ओव्हर"
"इट वॉज माय मिस्टेक. ’कोक्पर’ या शब्दाचा अर्थ माहीत करून घ्यायला हवा सर. ओव्हर."
"ठीक आहे. मी तो शब्द इंटेलिजंट्स कडे फॉरवर्ड करतो. त्यांच्याकडून नक्कीच कळेल ओव्हर."
"तो पर्यंत... एक मिनिट थांबा सर, ओव्हर" डेव्हिडचा वॉकीटॉकी वाजत होता
"वॉरहेड कमिंग ओव्हर"
"दिमित्री कमिंग सर; माझ्या उजव्या बाजूने काही जमाव फलक घेऊन येतो आहे. ओव्हर."
डेव्हिडने रायनोला ब्लॅकबर्डकडे डिटेल्स विचार म्हणून सांगितले.
"किती मोठा आहे?  ओव्हर."
"कळत नाही माझ्यापासून किमान तेराशे मीटर वर आहे. हातांत फलक आणि बॅनर आहेत. ओव्हर"
"फलकावर काय लिहिले वाच. ओव्हर"
"लोटस कमिंग चौकापासून तेराशे मीटर नॉर्थवरून एक मोर्चा जमाव येत आहे. काय आदेश ओव्हर?"
"आपल्याला त्यांच्यात  हस्तक्षेप करायचा नाही आहे. लक्षात ठेव. ओव्हर"
एव्हाना रायनोने जमाव तीनचारशेचा असल्याचे सांगितले आहे.
"लोटस कमिंग. ब्लॅकबर्ड तीनचारशेचा जमाव सांगत आहे. ओव्हर"
"ठीक आहे दहा मिनिटांत ऑपरेशन क्रॉसिंग तिथून पास होईल. जमावाला काहीच करू नका. ओव्हर"
"वॉरहेड कमिंग..मोर्चा सरकारविरोधी आहे असे वाटत आहे,  ’नो वॉर' 'गिव अस पीस' असे लिहिलेले फलक आहेत. ओव्हर" दिमित्रीने वॉकीटॉकीवरुन संदेश दिला.
"लोटस कमिंग. सरकार विरोधी वॉर विरोधी असे फलक दिसत आहेत ओव्हर" डेव्हिडने दिमित्रीचेच वाक्य पुन्हा उच्चारले.
"साधा मोर्चा असेल मग तिथले पोलिस बघून घेतील. पोलिसांशी बोलून एके ठिकाणी थांबवायला सांग. मग "क्रॉसिंग" गेल्यावर जाऊ द्या... पण आपल्याकडून काहीच अॅक्शन नको. कीप मी अपडेटेड. ओव्हर अँड आऊट"
"दिमित्री,  रुसलानला पाठवून पोलिसांशी बोलून घे. मोर्चा चौकाच्या  आधीच थांबवायला सांग. लगेच. कुठे पोचला आहे तो.?  ओव्हर"
"अकराशे मीटर सर.  ओव्हर"
"ओके थांबवा... ओव्हर अँड आऊट."  सूचना देऊन डेव्हिड रायनोकडे वळला.
"तू ब्लॅकबर्ड बरोबर त्यावर लक्ष ठेव आणि पोझिशन्स घेऊन ठेव तो पर्यंत मी मेसेज सगळ्यांना पोहचवतो. वॉकिटॉकी सगळ्यांशी एकदम कनेक्ट करून दे मला." रायनोने सगळ्या पॉइंट्सवरचे वॉकिटॉकी एकत्र सेट केले आता सगळ्यांना एकत्र एकमेकांशी बोलता येणार होते
"कमिंग ब्लॅककॅप  कमिंग"
"रॉजर ब्लॅककॅप विल्यम्स ओव्हर"
"त्वरित निघा चौकाजवळ एक मोर्चा येत आहे त्याला पोलिसांच्या मदतीने तिथेच थांबवा. रुसलान आहे तिथे. ओव्हर"
"ठीक आहे संशयितांना रूम मध्ये बंद करून ठेवतो. आणि तिघांना पहार्‍यावर ठेवतो. ओव्हर"
विल्यम्स जीप घेऊन लगेच निघाला. तीनचार मिनिटांतच तिथे पोचला. रुसलान पोलिस अधिकार्‍यांशी बोलतच होता. मोर्चा आता हजार मीटर दूर दिसला.
"काय सिच्युएशन आहे सार्जंट?"
"अजून लांबच आहे. तिथे काही पोलिस अधिकार्‍यांशी बोलणे होत आहे. तिथेच थांबायला आग्रह केला आहे"
"आग्रह ?  ऑर्डर दे सरळ.. तू एक यूनोचा सार्जन्ट आहे आणि तुझ्या बरोबर एक मेजर आहे. थांब तू"
"हॅलो इन्स्पेक्टर,  आम्हाला ऑर्डर्स आहेत हा रस्ता मोकळा ठेवायला. तुम्ही तो मोर्चा तिथेच दूर थांबायला हवा." थोड्या कडकपणेच विल्यम्स बोलला.
"हे बघा मिस्टर,"
"मेजर विल्यम्स. कॉल मी मेजर"
"ठीक आहे मेजर विल्यम्स. सिव्हिलिअन्स बाबत काय करायचे ते आम्हाला शिकवू नका. तो एक शांततेने चाललेला निषेध मोर्चा आहे. त्यात काही महिला, मुले आणि वृद्ध लोक देखील दिसत आहे. आम्ही त्यांच्याशी बोलतो आहोतच आणि बॅरिकेड्स लावल्या आहेत. दिसतंय तुम्हाला?" पोलिस ऑफिसरदेखील गुर्मीतच बोलला.
"आमचे महत्त्वाचे काम होणार आहे आता. म्हणून सांगत आहे." विल्यम्स देखील वर होऊ बोलू लागला.
इतक्यात रुसलान जवळचा वॉकिटॉकी वाजू लागला.
"कमिंग वॉरहेड कमिंग."
"रॉजर डेव्हिड कमिंग ओव्हर"
"सर तात्सुओ.. इथे मी गच्चीवर बघण्याकरिता आलेलो आहे. उत्तरेकडून 35°01'21.8"N 40°27'25.2"E ला तो मोर्चा थांबलेला आहे. तिथून काही लोक मधल्या रस्त्याने आत आपल्याकडे येत आहे. ओव्हर"
"कॉपी. तू लक्ष ठेव फक्त आणि एकदम गच्चीवर ओपन होऊ नकोस. आत रूममध्येच थांबून लक्ष ठेव. काही गडबड असेल तर लगेच सांग. ओव्हर"
"सर जॉर्जी हिअर मला देखील तेच दिसत आहे. बरेच लोक आता आतल्या रस्त्याने येत आहेत. मोर्चात जीप-कार देखील आहेत. काही मधोमध आहेत आणि आजूबाजूला माणसे असल्याने नीट दिसत नाही. ओव्हर"
"ठीक आहे. जॉर्जी आणि तात्सुओ. तुम्ही मोर्च्यावर लक्ष ठेवून राहा. ओव्हर"
"कमिंग अॅर्नॉल्ड कमिंग."
"रॉजर अॅर्नॉल्ड कमिंग ओव्हर."
" तात्सुओ त्या मोर्चावर लक्ष ठेवत आहे. तू त्याच्या खालच्या रस्त्यावर आणि 120 डिग्री नॉर्थ रस्त्यावर लक्ष ठेव. ऑल्विन मशिदीमागच्या रस्त्यावर लक्ष ठेवेल. ओव्हर"
"ठीक आहे.  ओव्हर अॅड आऊट."
"कमिंग टीम बी कमिंग."
"रॉजर सार्जंट सुलेमान, कमिंग सर, ओव्हर."
"सुलेमान, दगडी घराच्या मागचा सगळ्या परिसरावर आपली माणसे तैनात आहेत ना? अॅर्नॉल्ड तात्सुओच्या पॉइंटवर लक्ष देणार आहे"
या सगळ्या सूचना देत असतानाच रायनोला ब्लॅकबर्ड कडूनं महत्त्वाची सूचना आली की ऑपरेशन क्रॉसिंग सात मिनिटांत पोहचत आहे.
"डेव्हिड, दे आर कमिंग"
"बी अलर्ट बॉइज" डेव्हिड थोडा चिंतेत होता. हल्ला होणार आहे हे माहीत होते. पण कुठून कसा हे सांगायच्या आधीच युसुफ मरण पावला होता.
"सर सार्जंट जॉर्जी. मोर्चा थांबल्यामुळे बरेच ट्राफिक थांबले आहे. काही कार आतल्या रस्त्यातून यायचा प्रयत्न करत आहेत. माझे लक्ष आहे. "
इकडे विल्यम्सला देखील माहिती मिळाली "ऑपरेशन क्रॉसिंग" जवळ येत आहे.
"ऑफिसर, ऑफिसर सगळ्यांना बाजूला घ्या. आमच्या गाड्या येत आहेत." विल्यम्स लांबून येणार्‍या गाड्यांकडे बघून ओरडला. लांबून दोन चिलखती हम्वी त्यांच्या मागे एक व्हॅन त्याच्यामागे अजून एक हम्वी  अशी टीम एकमेकांत शंभरेक फुटांचे अंतर राखून वेगात येताना दिसल्या. त्यांच्यावर "ब्लॅकबर्ड"  होते. तिथून त्यांना पुढच्या सूचना दिल्या जात होत्या. पहिल्या दोन हम्वी चौकातून पुढे निघून गेल्या. त्यातली एक डेव्हिडच्या इमारतीशी पोचली असता अचानक तिच्यासमोर इमारतीच्या मागच्या रस्त्याने एक कार जोरदार ब्रेक मारून आडवी थांबली. रायनो काय झाले बघायला गच्चीच्या दुसर्‍या बाजूस पळाला तेव्हढ्यात कारमध्ये जोरदार स्फ़ोट झाला. दोन्ही हॅम्वी थांबल्या. व्हॅन बरोबर सुपर मार्केटच्या थोडे पुढे थांबली. मागची हम्वी चौकातच थांबली. स्फ़ोटाच्या आवाजाने मोर्चात जणू भूकंपच झाला. सगळे  लोक सैरावैरा धावू लागले. चौकाकडे ,  गल्ल्यांत,  मशीदीच्या मागच्या रस्त्याने असे, लोक पळू लागले. या गोंधळात मोर्चामधील एक टोयोटा ट्रक वेगाने समोरील लोकांना चिरडत  चौकाकडे येऊ लागला.
"आपल्यावर हल्ला झाला आहे. आय रिपीट वी आर ऍटॅक्ड." विल्यम्सने वॉकीटॉकीवर लगेच संदेश पाठवला आणि आपली रायफल L85 घेऊन पोझिशन मध्ये आला. ट्रक मधून एका माणसाने रॉकेट लॉन्चर काढून चौकात थांबलेल्या हॅम्वीवर फायर केले.
"इन्कमींग" विल्यम्स जोरात ओरडला आणि त्याने रुसलान व पोलिस ऑफिसरवर झेप घेऊन त्यांना दूर ढकलले. रॉकेटचा स्फोट त्याच्या बाजूलाच झाला.  विल्यम्सला जबर मार बसला. शरीराची डावी बाजू पूर्णं जखमी झाली.
"मेजर विल्यम्स हिट. आय रिपीट मेजर विल्यम्स हिट. मेडीक मेडीक." रुसलानने वॉकीटॉकीवर मेसेज पाठवला. तरीही त्याला बाजूला सारून विल्यम्सने आपल्या रायफलीतून फायर करायला सुरुवात केली. रॉकेट लाँच करणार्‍याला दिमित्रीने टार्गेट केले. विल्यम्सने  जोरदार फायरिंग करून ट्रक थांबवला.
इथे डेव्हिडच्या लक्षात आले की हल्ला झाला आहे. त्याने सगळ्यांना पटापट सूचना दिल्या.(हल्ला झालेला दिसताच सर्वांना पटापट ऑर्डर्स सोडत डेव्हिडने स्वतः गच्चीवर पोझिशन घेतली. रायनोने गच्चीच्या टाकीवर पोझिशन घेतली. डेव्हिडचे सर्व लक्ष मार्केटजवळ थांबलेल्या व्हॅनवर होते. त्यातच त्या "पुढार्‍यांना" ठेवले होते. दगडी घराच्या मागच्या बाजूने देखील आता स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज येऊ लागले. अतिरेक्यांनी  त्या दिशेने प्रवेश मिळवला होता आणि त्यांची टीम बीशी जोरदार चकमक  सुरू झाली. अॅर्नॉल्डने आता तात्सुओची बाजू सोडून दिमित्रीच्या मागच्या बाजूकडे वळला. किमान दहापंधरा जीप-व्हॅन भरून हल्लेखोर दक्षिणेकडून येत होते.
"कमिंग डेव्हिड कमिंग"
"रॉजर डेव्हिड कमिंग ओव्हर"
"दक्षिणेकडून हेवी अॅटॅकर्स येत आहेत. टीम बी बरोबर टीम सी पाठव. लवकर. ओव्हर."
"कॉपी.. टीम सी तुम्ही टीम बी ला जॉईन करा हेवी ट्रूप्स येत आहेत. सुलेमान सिचुएशन सार्जंट ड्युक बरोबर शेअर करा.. शक्य तिथे लेजर टार्गेट तयार करा. अॅर्नॉल्ड पुढे बघून घेईल  क्लिअर ऑल ऑफ देम.. टीम ए मशीद कव्हर करा आणि टीम डी व्हॅन कव्हर करा. ओव्हर... "
"रॉजर दॅट सर" सुलेमान ने रिस्पॉन्स दिला
"कॉपी सर.. वी आर ऑन द वे.. ओव्हर अँड आऊट." टीम सी मधला सार्जन्ट ड्युकने उत्तर दिले.
इमारतीच्या खाली थांबलेल्या हम्वी मधून सैनिक बाहेर येऊन  व्हॅनच्या आजूबाजूला जमले होते. व्हॅन मधून पुढाऱ्यांना बाहेर काढून मार्केटच्या मागील घरात घेऊन गेले. हल्लेखोर आता मशीदीच्या मागच्या बाजूने आणि दगडी घराच्या बाजूने येऊ लागले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार फायरिंग चालू होते. मधूनच पेट्रोल बॉम्ब,  हातबॉम्ब घेऊन हल्लेखोर घराच्या छतांवरून सैनिकांवर फेकायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांची चाल स्नायपर्स निष्फळ ठरवत होते. तात्सुओ आणि अल्विन  यांनी मशिदींच्या बाजूने येणार्‍या हल्लेखोरांना एकेक करून टिपायला सुरुवात केली. तात्सुओने गच्चीवरून मोर्चातल्या गाड्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. तर डेव्हिडच्या इमारतीच्या मागच्या बाजूला असणार्‍या जॉर्जी आणि सॅमीने टीम ए ला सपोर्ट देत इमारतीच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरून येणार्‍या हल्लेखोरांना लक्ष्य करणे सुरू केले.  विकी आणि अल्विनने टीम डी ला सपोर्ट करत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले.
"मेजर विल्यम्स हिट. मी त्याला इमारतीकडे पाठवत आहे. सर. ओव्हर"
"रॉजर. पाठवून दे लवकर ओव्हर"
डेव्हिडने वायरलेस रेडिओवरून जनरलला परिस्थिती कळवली. पुढारी असणारी व्हॅन सुरक्षित आहे हे कळवले. मोर्चातूनच  हल्ला झाला हे देखील कळवले.
"टीम डी, आतल्या लोकांना व्हॅन बरोबर इमारतीच्या समोर आणण्याचा प्रयत्न करा ओव्हर." डेव्हिडने सूचना दिली.
"निगेटिव्ह वॉरहेड.. तुमच्या मागच्या बाजूने  मोठ्या संख्येने हल्लेखोर येत आहे. तसेच समोरून देखील काही वाहने  येत आहे. ओव्हर." ब्लॅकबर्डने वरून नजर ठेवून असल्याने पुढील धोका लगेच कळवला.
"कॉपी.. जॉर्जी पूर्वेकडून वाहने येत आहेत लक्ष ठेव... ओव्हर" " रायनो पुढे मी लक्ष देतो तू मागून येणार्‍या वाहनांवर लक्ष ठेव." 
दगडी घराशी तुफान धुमश्चक्री चालू होती. सुलेमान  आणि टीम बी व टीम सी ने हल्लेखोरांना थोपवून धरले होते. मधूनमधून लेजर टार्गेटचा वापर करून ते अॅर्नॉल्डची मदत घेत होते. हल्लेखोरांनी त्या बाजूच्या इमारतींवर कब्जा करून तिथून फायरिंग चालू केले होते. सुलेमानने सार्जंट ड्युकला पॉइंट देऊन काही साथीदारांसोबत पुढे इमारतीकडे सरकायला सुरुवात केली.
"कमिंग अॅर्नॉल्ड कमिंग"
"रॉजर.. अॅर्नॉल्ड ओव्हर"
"सुलेमान हिअर.. मी समोरच्या इमारतीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तिथून एमएमजी मधून फायरिंग होत आहे. आमच्या टीमला पुढे जाता येत नाही आहे. मी दोनतीन साथीदारांना घेऊन पुढे जातो. लेझरचा प्रयत्न करतो. ओव्हर"
"ठीक आहे सुलेमान... स्प्रिंग बदलताना पुढे हो ओव्हर"
सुलेमान आपली एम203ने समोरच्या इमारतीकडे लक्ष ठेवून हळूहळू पुढे सरकू लागला.  एमएमजी मशीनगन्स स्प्रिंग बदलण्यासाठी थांबताच सुलेमान आणि साथीदार धावतच इमारतीजवळच्या भिंतीशी गेले. मागून ड्युक त्यांना कव्हरींग फायर देतच होता.
"सर मला एमएमजी दिसत आहे. पण हल्लेखोर नाही. लेझर लावता येत नाही आहे. ओव्हर"
"अँगल बदलून बघ ओव्हर"
"निगेटिव्ह समोर इमारतीच्या भिंतीकडून जाणाऱ्या रस्त्यांवर त्यांची नजर आहे.  ओव्हर" सुलेमान फायरिंग चालू ठेवूनच बोलत होता.
"मला इथून जितक्यांना टिपता येईल तितके टिपतोय. पोझिशन चेंज करता येत नाही दिमित्रीवर देखील लक्ष ठेवायचे आहे ओव्हर." अॅर्नॉल्ड मनातल्या मनात विकीला दोष देत सुलेमानला बोलला.
"कॉपी. मी ग्रेनेड वापरून बघतो. ओव्हर. अँड आऊट" सुलेमानने रायफलमध्ये ग्रेनेड भरले आणि इमारतीवर निशाण साधले. धुड्डुम.. नेम अचूक लागला होता.. ड्युकने टीमला ताबडतोब पुढे पाठवले आणि इमारतीपाशी  जाऊन हल्लेखोरांवर फायरिंग सुरू केली.
डेव्हिडने सेंट्रलब्लॉकच्या गच्चीवरून आणि त्याखाली असणार्‍या हम्वीमधल्या सैनिकांनी मोर्चा सांभाळला होता. त्यांनी डेव्हिडच्या साथीने  एकाही हल्लेखोराला व्हॅनजवळ जाऊ दिले नव्हते. विल्यम्सदेखील जखमी अवस्थेत काही वेळात तिथे पोचला. गच्चीवर नेऊन मेडिकल टीमने त्याच्यावर तात्पुरते उपचार सुरू केले. डेव्हिडचे लक्ष देखील अर्धे विल्यम्सवर आणि अर्धवट व्हॅनवर लागून राहिले होते.
"टीम ए आणि डी शक्य तितक्या लवकर इमारतीची मागची बाजू क्लिअर करा. आपल्याला व्हॅन आणखी जवळ आणायची आहे. प्रयत्न करा. विकी तू मागची बाजू बघ. अल्बनला समोर लक्ष देऊ दे... मला लवकरात लवकर व्हॅन जवळ आणायची आहे." टीम ए मधील काही सैनिक मशिदीशी थांबले व बाकीचे मागील रस्त्याशी गेले. रायनोदेखील वरून हल्लेखोरांवर फायरिंग करतच होता. उत्तरेकडून आलेल्या  हल्लेखोरांची संख्या दक्षिणेकडून आलेल्या हल्लेखोरांच्या  तुलनेत कमी होती. जोरदार फायरिंग सुरू होते. अशा परिस्थितीत कुणालाच आपली पोझिशन सोडता येत नव्हती. रायनो खाली उतरण्याचा विचार करू लागला.  वरून टार्गेट करण्यापेक्षा खाली मैदानात उतरणे जास्त त्याला आवडत असे. प्रथमोपचारांनंतर विल्यम्स थोडा स्थिरावला होता डावी बाजू  जखमी झाल्याने त्याला स्नायपर सांभाळणे शक्य होत नव्हते. खाली बसून विल्यम्स डेव्हिडला मदत म्हणून दुर्बिणिने  टार्गेट्स पाहून सांगू लागला. आणि डेव्हिड व्हॅनजवळ येऊ पाहणार्‍या हल्लेखोरांना टिपू लागला.
सगळ्यांना लवकरात लवकर गाड्या पुढे पाठवायच्या होत्या म्हणून रायनोने तो भाग क्लिअर करण्यासाठी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. रायनो खाली आल्यावर व्हॅनजवळ गेला. त्या नेत्यांना लवकरात लवकर पुढे काढा म्हणून ऑपरेशन कमांडरने सूचना केली. रायनोने हम्वीमधे बसून थेट जळत असलेल्या कारवर धडक मारली आणि सुसाट पुढून येणार्‍या कारवर आदळवली. हम्वीमधल्या सैनिकांनी तुफान गोळीबार चालू केला त्यांना वरून विकीचीदेखील साथ मिळाली. रोडब्लॉक बर्‍यापैकी कमी होऊ लागला.
सैनिकांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे त्यांची ताकद हळूहळू कमी होऊ लागली. सतत होणार्‍या फायरिंगऐवजी आता थांबून थांबून होऊ लागली याचाच अर्थ त्यांची संख्या कमी होऊ लागली होती. अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. रोडब्लॉक असल्याने ते क्लीअर करण्याचे काम टीम डीला दिले गेले. पूर्वेकडून हल्लेखोर लावत असलेले रोडब्लॉक टीम डी बरोबर उध्द्वस्त करत रायनो पुढे सरकत होता.
"कमिंग डेव्हिड कमिंग"
"रॉजर डेव्हिड ओव्हर"
" टीम डी बरोबर मी रायनो. ब्लॅकबर्डच्या सूचनेनुसार पूर्वेकडचे रोडब्लॉक क्लिअर करत आहे.. माझा सिग्नल मिळेपर्यंत नेत्यांची व्हॅन पुढे पाठवू नका ओव्हर"
"कॉपी.  मी पुढील सूचना मिळेपर्यंत व्हॅन इमारतीजवळ आणून ठेवतो. ओव्हर अॅड आऊट"
 व्हॅनच्या दिशेने अधून मधून गोळीबार होतच होता. जीप देखील भरधाव धडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण टीम ए ने त्यांचा प्रयत्न विफल केला. हल्लेखोरांना व्हॅन मध्येच नेते आहेत हे आधीच कळले होते. त्यानुसारच त्यांची योजना तयार होती. डेव्हिडने जनरलला संपर्क साधला त्यांच्याशी बोलता बोलता त्याची स्नायपर गन मधूनच लक्ष्य टिपत होती.
"लोटस, त्यांचा हल्ला कमी होऊ लागला आहे. त्यांनी जागोजागी टायर जाळून रोडब्लॉक केले आहेत. टीम डी बरोबर रायनो पूर्वेकडचे  रोडब्लॉक काढण्याचे काम करत आहे. तो पर्यंत मी व्हॅन माझ्या इमारतीजवळ घेऊन येऊ का?  ओव्हर"
"ब्लॅकबर्ड काय सांगत आहेत?  ओव्हर"
"निगेटिव्ह. रोडब्लॉक आणि मागील रस्ता क्लिअर झाल्याशिवाय आणू नकोस असे सांगितले ओव्हर"
"बरोबर आहे. आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. क्लिअर झाल्याशिवाय अजिबात आणू नकोस. आणि व्हॅनच्या जवळपास कोणीच जाता कामा नये. शूट देम. "
"लोटस कोक्पर बद्दल काही माहिती मिळाली का?  ओव्हर"
"नाही. जशी मिळेल तसे लगेच सांगेन.. लवकरात लवकर त्यांना पुढे पाठवा. ओव्हर अँड आऊट."
डेव्हिडकडे आता पर्यायच राहिला नाही. मागील रस्ता आणि रोड्ब्लॉक क्लिअर झाल्याशिवाय त्याला व्हॅन स्वतःजवळ आणता येणार नव्हती. हुकूम तो शेवटी हुकूमच. खरं तर सातशे मीटरवर असणार्‍या व्हॅनवर लक्ष ठेवणे अवघडच होते. हल्लेखोरांचे मुख्य टार्गेटच ते असल्याने कुठून ही हल्लेखोर त्या दिशेने येत होते. डेव्हिडने पंधरावीस टार्गेट्स शूट केले होते. गोळ्यांच्या आणि बॉम्बस्फोटाच्या गोंगाटातही तो सर्वत्र लक्ष देत होता.
विल्यम्स बराच जखमी झाल्यामुळे  गच्चीच्या भिंतीला टेकून बसला. डेव्हिड आपली स्नायपरगनचे scope अॅडजेस्ट करत आजूबाजूला पाहत होता. त्याने बघितले चौकाच्या पश्चिमकडून साधारण बाराशेमीटरवरून एक तरुणी आणि आठदहा वर्षांचा एक मुलगा आजूबाजूला पहात सावकाश येत होते. लहान मुलाने घोळदार ’फिरन’  घातला होता. असे पोशाख जास्त हिवाळ्यात घालतात म्हणून डेव्हिडला कुतूहल वाटले.  बरोबरची तरुणी इकडे तिकडे बघत त्याला आणत होती. विल्यम्सला अशक्तपणामुळे सारखी ग्लानी येत असल्याने डेव्हिडने त्याला हलवून जागे केले आणि  वॉकीटॉकीवर येणार्‍या मेसेजवर लक्ष द्यायला सांगितले. डेव्हिडने  हेडफोनला सॅटेलाईटफोन जोडला आणि माहिती देण्यास सुरुवात केली. 
"कमिंग लॉट्स कमिंग. वॉरहेड टू लॉट्स"
"कॉपी दॅट.  लॉट्स हिअर व्हॉट्स न्यू ?  ओव्हर"
" नथिंग,  चौकातून  कोणी येत नाही आहे. दगडी घराजवळून  दोघेतिघे अधूनमधून येत आहेत. त्यांची संख्या बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे असे वाटत आहे.  ओव्हर"
"अॅर्नॉल्डला गरज लागल्यास व्हॅनजवळ बोलवून ठेव. व्हॅनजवळ आपल्यापैकी कोण आहे?  ओव्हर"
"नाही टीम ए आहे. आणि व्हॅनमधल्या सैनिकांनी मोर्चा सांभाळला आहे. ओव्हर"
"अॅर्नॉल्डला पाठव त्यांच्याजवळ. ओव्हर"
"एक तरुणी लहान मुलाला घेऊन चौकाच्या दिशेने  सावकाश येत आहे. ओव्हर"
"या धुमश्चक्रित?  ओव्हर"
"हो. माझे लक्ष आहे त्यांच्यावर. बहुदा चौकाच्या आधीच काम असेल त्यांचे. ओव्हर"
"मुलींकडे लक्ष कमी द्या. अॅर्नॉल्ड आला?. ओव्हर"
"हो. विल्यम्सने वॉकिटॉकिवरुन मेसेज दिला. ओव्हर"
"डेव्हिड कोक्पर बद्दल माहिती आली आहे.  अफगाणी खेळात वापरायच्या साहित्याला "कोप्कर" म्हणतात."
"खेळ????  मग ते नाव का ठेवले जाईल.?"
"काही विशेष असेल त्यात."
"काय खेळ आहे?"
"विचारतो आहे. थांब"
"विल्यम्स मला काहीतरी दिसते आहे, दुर्बीण लाव." विल्यम्स जखमी अवस्थेत कसाबसा उठला.
"तो मुलगा फारच हळू येत आहे. कोटाच्या खालच्या टोकाला लाल काळे काय आहे?"
"काही दिसत नाहीए. झालर टाईप काही असेल. ओ! ही तीच मुलगी आहे."
"कोणती?"
"तीच, सकाळी जिच्याबद्दल सांगितले होते. खिडकीतून जी सारखी दिसत होती पण लहान मूल नव्हते. घरी नवरा होता.
हो. पण आता ती एका लहान मुलाबरोबर आहे."
"हो. पण काल बराच वेळ...." .सॅटेलाईटफोनवर जनरलचा आवाज आला.डेव्हिडने विल्यम्सलाही फोनशी कनेक्ट केले.
"अफगाणिस्तान मध्ये "बुझकशी" नावाचा एक खेळ आहे त्यात रिंगणात मेलेल्या लहान बकर्‍याचे शव ठेवले जाते ते घोडस्वारांनी उचलायचे आणि मैदानाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या गोल रिंगणात नेऊन टाकायचे. असा काहीसा प्रकार आहे. यात घोडेस्वार हे शव ताब्यात घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. तू रग्बी बघतोस ना? तसाच काहीसा प्रकार बॉल ऐवजी बकर्‍याचे शव असते."
"बकर्‍याचे शव ?  मग युसुफ बकर्‍याबरोबर काय करणार होता? कोक्पर?"
"मे बी बकर्‍यांचा कळप घुसवून हल्ला वगैरे.."
"नाही. तसे काही असेल वाटत नाही. ब्लॅकबर्डला विचारतो आजूबाजूला  बकर्‍यांचा कळप दिसतोय का ते."
"विल्यम्स, मला नाही वाटत बकर्‍यांना कशाही प्रकारे वापरण्यात येईल."
"पण... तो युसुफ तर कोक्पर ... कोणत्या अर्थाने म्हणाला असेल?"
"मे बी आणखी काही. पण हल्ला विफल झालाय कुठे  अजून?"
डेव्हिडने परत चौकावर नजर फिरवली. ती मुलगी आता थोडी भरभर चालत होती. दोन्ही हात एकमेकांना पकडून येत आहे.. पण मुलगा सांभाळूनच चालत होता. डेव्हिडने पुन्हा एकदा मुलीवरून नजर रोखली. तिने हिजाब घातला होता आणि दोन्ही हात पोटाशी धरले होते. चौकाच्या जवळ येताच मुलीने मुलाला रस्त्याच्या बाजूला घेतले आणि त्याला थोडे पुढे ठेवून सावकाश चालू लागली होती.
"विचार कर. विचार कर विल्यम्स. कोक्पर बकरा बुझकशी हल्ला यांच्यात काय कॉमन असेल?"
"तेच करतोय बकर्‍यांकरवी हल्ला होईल हा एकच विचार सध्या मनात येतोय."
"हेच पटत नाही. काय बघतोयस?"
"काही नाही. माझ्या लहानग्याचा फोटो बघतोय. माय किड् सबॅस्टिअन"
"किड!"  डेव्हिड थाडकन उडला.
"विल्यम्स, किड! किड!! लहान बकर्‍याला किड देखील म्हणतात. कोक्पर हे लहान बकर्‍याचे शव! किड! ओह माय गॉड! ते लहान मुलांचा वापर करणार आहे." डेव्हिडने त्या मुलावर स्नायपरगनचे scope रोखले आणि काळजीपूर्वक पाहू लागला. चौकापासून ते अजून थोडेसे लांबच होते.
"लोटस कोक्परचा डीकोड बहुतेक सापडला." डेव्हिड अजूनही थरथरतच होता.
"काय?"
"लहान बकर्‍याच्या शवाला कोक्पर म्हणतात. लहान बकर्‍याला किड देखील म्हणतात. किड म्हणजे लहान मुलगा देखील होतो. आता एक युवती एका लहान मुलाला घेऊन माझ्या दिशेने येत आहे. काय ऑर्डर लोटस?"
"तुला त्या दोघांचा संशय येतोय?"
"हो पण..."
"ती वायर आहे डेव्हिड," विल्यम्स किंचाळला.
"काय ?" डेव्हिडने  scope त्या मुलावर रोखून अॅडजस्ट केले. कपड्यातून मगाशी प्लॅस्टिकसारखे दिसत होते ते आता अजून थोडे खाली आल्याने स्पष्ट दिसत होते. त्या लाल, पिवळी आणि काळी अशा, तीन वायरी जोडून बनवलेली एक  वायर होती. मुलाच्या चालण्यासरशी खालीखाली सरकत होती.
"येस. ती वायरच आहे! "
"आर यू श्युअर?"
"येस सर. अगदी नक्की..." विल्यम्सने उतावीळपणे उत्तर दिले.
"हो सर, पण..."
सर ते गाडीच्याच दिशेने येऊ लागले आहेत.. आणि तो मानवी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. कोणीही जवळ गेल्यास सोल्जर्सच्या जिवाला धोका निर्माण होईल. त्यांना रोखण्याकरिता ऑर्डर द्या सर."
"डेव्हिड तुझे काय म्हणणे आहे?"
.....
"सर वेळ जातोय. ते जवळ येताहेत". विल्यम्स त्याच्यांवरच दुर्बीण रोखून होता. रांगत रांगत गच्चीच्या कोपर्‍याशी कठड्याजवळ आला.
.....
.....
" युअर कॉल डेव्हिड .. बट शुट इज बेटर ऑप्शन!" जनरलचा करडा आवाज दोघांच्या कानात तप्त शिशासारखा उतरला.
"पण सर... लहान मुलगा आहे."
"इट्स ओके . इट्स ऍन ऑर्डर. डेव्हिड शूट." विल्यम्स बोलला
"हाऊ कॅन यु से दॅट ..."
"इट्स ऍन ऑर्डर डेव्हिड. वी हॅव टू टेक ऑर्डर्स.. नॉट टू थिंक."
तो पर्यंत ती मुलगी आणि मुलगा चौकात पोहचले. मुलगी थांबली. बाजूच्या इमारतीच्या भिंतीशी जाऊन तिने मुलाला जवळ घेतले. ती त्याला काही सांगू लागली.
"इट्स जस्ट अ  किड. तुझ्या मुलाएवढा असेल."
"तो माझा मुलगा नाहीए. शुट हिम." विल्यम्सच्या चेहर्‍यावर शून्य भाव होते.
"आपण दुसरं काही करता येतं का पाहू. ते थांबले आहेत तिथे मी विकीला पाठवतो."
"इतका वेळ नाहीए आपल्याकडे. विकी रायनोबरोबर गेला आहे. डेव्हिड शूट. तू वेळ घालवतो आहेस."
"डेव्हिड. निर्णय घे. युवर कॉल..सिव्हिल आहे." जनरल ने शेवटचा ऑप्शन दिला
"वेळ नाहीए डेव्हिड..".
दोघांच्याही नजरा त्या तरुणी व मुलावर. मुलगी उभी राहिली. तिने मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि आपल्या समोर  उभे केले. काही क्षण शांतपणे आजूबाजूला पाहून मुलाच्या खांद्यावर थोपटले. त्या लहान मुलाने मान उंचावून तिच्याकडे पाहिले आणि  व्हॅनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मुलगी थोडे अंतर राखून त्याच्यामागे चालू लागली.
"बॉय मुव्हिंग टुवर्ड्स व्हॅन."
"डेव्हिड, काय करतोयस? कसली वाट बघतोयस? शूट हिम नाउ."
"इट्स नॉट इझी. फ़ॉर गॉड्स सेक. तू मला एका आठदहा वर्षांच्या लहान मुलावर गोळी चालवायला सांगतो आहेस."
"हो. पण तो लहान मुलगा नाहीए. तो एक मानवी बॉम्ब आहे. त्याचा चालण्याचा वेग वाढतोय डेव्हिड. त्याच्या छातीकडे बघ. शूट नाउ!" विल्यम्स किंचाळला.
डेव्हिड श्वास रोखून पाहत राहिला. एक जिलेटीनची काडी एका पिसीबी प्लेटला जोडलेली. फिरनचे वरचे बटण उघडे असल्यामुळे चालताना अधून मधून दिसत होती. त्यातून छोटे एलएडी बल्ब लुकलुकत होते. एका क्षणात डेव्हिडचे तोंड कोरडे पडले. त्याने आयुष्यात बर्‍याच अतिरेक्यांना, दंगेखोरांना गोळ्या  घातलेल्या; अगदी शांतपणे. पण असा लहान मानवी बॉम्बं पहिल्यांदाच डोळ्यांसमोर येत होता.
"इट्स क्लिअर. द बॉय इज अ ह्युमन बॉम्ब!" डेव्हिडचा गळा दाटून आला.
"डेव्हिड, शूट. इट्स माय ऑर्डर."
शूट डेव्हिड."
कॅन आय शुट ऑन लेग टु स्टॉप हिम..." डेव्हिड शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला वाचवायचा प्रयत्न करत होता.
"शूट नाउ"
मुलाने चौक ओलांडला. मुलगी आता रस्ता क्रॉस करून अचानक थांबली.  मुलाचा वेग वाढला. व्हॅनकडे एकटक पाहत तो चालत होता.
"शुऽऽऽट.." विल्यम्स दुर्बीण रोखूनच होता खच्चून किंचाळला.
डेव्हिडने मुलाच्या वेगाशी गन अॅडजस्ट केली. मुलाच्या मांडीवर टार्गेट सेट केले.
खाड्क खट.!!
चाप ओढला गेला.
.50 BMG बुलेट लोड झाली.
खट्ट. खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..
.....................
.................
आय ऍम सॉरी सन.... डेव्हिड दाटलेल्या गळ्याने बोलला. त्याने ट्रिगरवरचे बोट ओढले.
ठोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.
त्याच क्षणी घात झाला. बॉम्बचे ओझे घेऊन धावणारा मुलगा अचानक धडपडून गुढघ्यावर बसला.. पण........... गोळी ने आपले काम चोख बजावले...
.
.
.
.
.
. डेव्हिडच्या टार्गेटने केलेला ’पॉइंट ब्लॅक’ त्याच्या नावावर नियतीने लावला.
टार्गेट हिट... डेव्हिडने हताशपणे सॅटेलाईटफोन वर माहिती दिली.
ठोऽऽ अजून एक गोळीचा आवाज ऐकून डेव्हिडने वर बघितले.
विल्यम्सने अचानक जखमी अवस्थेत एका हातात रायफल कशीबशी पकडून त्या तरुणीला टार्गेट केले होते. ती रिमोटाचे बटण दाबायच्या प्रयत्नात होती.
"कॉलिंग  टीम डी कॉलिंग"
"टीम डी कमिंग ओव्हर"
"मुलाच्या अंगावर रिमोट बॉम्बं आहे डिफ्यूज करा. आणि दोन्ही बॉडीज इमारतीमध्ये घेऊन या. ओव्हर अँड आऊट"
...
.
.
.
.
"रोडब्लॉक इज क्लिअर. सेंड देम. " रायनो ने वॉकिटॉकीवरुन संदेश पाठवला...
व्हॅन मध्ये नेत्यांना बसवून सैनिक पुढे निघाले. डेव्हिड पूर्वेकडे जाणार्‍या ताफ्याकडे ते दिसेनासे होईतो बघत होता. पण त्याची नजर "शून्यात" होती. ताफा दिसेनासा झाल्यावर डेव्हिडने रेडिओवर संदेश दिला.
"धिस इज वॉरहेड.mission accomplished...  आय रिपीट mission accomplished..  ओव्हर अँड आऊट."