शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

ग्लोबल वार्मिंग - ARTICLE

बदल होने हा नियमच आहे निसर्गाचा..ग्लोबल वार्मिंग वगैरे वगैरे आपण आज बोलतोय पण केले कुणी आपणच ना..
माझ्या मते तरी निसर्ग समर्थ आहे ह्या सगळ्या गोष्टीचा निचरा करण्यासाठी फ़क्त त्याला वेळ लागतोय अणि थोडा मार्ग आणि नियम बदलत आहे..आपल्या कड़े या वेळेला पाउस उशिराने चालू झाला...मागच्या ५ -७ वर्षा पासून पाउस हा सतत उशिराने येत आहे...
कोणी लक्ष दिले या कड़े ?...
मी जेव्हा शाळेत होतो त्या वेळी पाउस हा नेमका १३ जून ला तरी हमखास यायचा..तेव्हा वाटायचे की आपण शालेला जाताना आपल्या बरोबर आपला सोबती म्हणून येतोय..पण आता सहामाही परीक्षा संपायला आली तरी..
पाउसचा पत्ता नहीं..आपला मौसमी निसर्ग बदलतोय..जो पाउस जून मधे येत होता तो आता आगस्त च्या नंतर जोर पकड्तोय..तसाच फेब्रुवारी मधे ठंडी कडाक्याची पडत आहे ती सुद्दा मुंबई सारख्या समुद्रलागत च्या शहरात..!!मार्च अप्रैल मधे तर विचारूनच नका मे महिन्यासारखे गरम होत असते..!!
निसर्ग बदलतोय..आपण सुद्दा बदलायला हवे..उगाच चिंता करून काही ही फायदा होणार नहीं जे आपण आधी केलेले आहे त्याचेच फल आता येत आहे अणि ते येणारच आहे..
आपल्या हातात फ़क्त एकाच आहे ज ज चूका आपण आधी केल्या आहेत त्या परत होऊ नये..यातच आपले कल्याण आहे..अन्यथा जे परिणाम होणार आहेत त्या पेक्षां भयंकर परिणाम आपल्याला दिसतील...

क्रिकेट वर्ल्ड कप 2011 - ARTICLE

नमस्कार.......२०११ चा क्रिकेट वर्ल्ड कप भारतच जिंकावा.......हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!!!!!
भारतात विश्वचषक यावा हे कुणाचे ही स्वप्न..!! हे माझ्या सारख्या तमाम क्रिकेट प्रेमींना ८७ पासुन पडलेले स्वप्न...२००३ ला ते सत्यात उतरण्यासाठी फक्त एकच सामना दुर होते ...आणि राहिले...!! २००७ ला तर ते दु:खस्वप्नच ठरले.....
पण
भारतात क्रिकेट चे एवढे वेड आहे की बाकिचे खेळ लोक विसरुन जातात. इतर खेळाडुंचे मोल कमी होते...हॉकी सारख्या खेळात आपला केवढा दबदबा होता. पण १९८३ च्या विश्वचषकाच्या जल्लोशात आपण बाकिच्या खेळांना विसरुन गेलो. खरचं विसरुन गेलो. इतके कि जो पर्यंत २००७ चे दु:ख स्वप्न सत्यात उतरे पर्यंत...८३ ते २००७ या काळात जन्माणार्‍या पिढीला क्रिकेट हा एकच खेळ प्रामुख्याने माहीत होता. त्यात साक्षात कलियुगीन क्रिकेट चे देव (सचिन) खेळत असल्याने त्यांच्या किर्तीमान प्रकाशाने इतर खेळ दिपत होते..यात सचिन चे काहिच चुकिचे नव्हते कारण असा खेळाडु शतकानुशतकां मधे एकदाच जन्माला येतात.
इतर खेळातले खेळाडु मात्र प्रायोजकच नसल्याने त्यांचा विकास खुंटत चालला होता. त्यातल्या त्यात विश्वनाथ आनंद, लिअंडर पेस, महेश भुपती, बायचुंग भुतिया, गोपिचंद सारखे खेळाडु आपापली चुणुक दाखवत होते. पण खरा विकास मात्र होत नव्हता. हॉकी मधे सुद्धा आपण मागे पडत चाललेलो. (एकटा धनराज काय करणार होता).
ऑलम्पिक चे पदक फक्त एक स्वप्न होते. खाशबा जाधव आणि हॉकी (१९८३ पुर्वीची) मधेच आपण पदक जिंकलेले इतर खेळाचे तर पदक आपल्या स्वप्नात देखिल येत नव्हते. ते ९६ च्या अटलांटीक ऑलम्पिक मधे पेस ने टेनिस मधे ब्रांझ पदक मिळवले.
क्रिकेट च्या विरोधात मी नाही पण क्रिकेट मुळे आपण इतर खेळांना विसरत चाललोय. फुट्बॉल, हॉकी, इतर खेळांना किती महत्त्व देण्यात येते? डीडी स्पोर्ट्स चॅनल वर आपण किती भारतीय खेळ बघतो. ?
हा प्रश्न केवळ आपल्या साठी नाही तो माझ्या साठी सुध्दा आहे.....
आता विश्व चषक फुटबॉलचे मी मॅचेस रात्र रात्र भर जागून पाहत होतो. पण त्याच बरोबर यात भारत नाही याचे शल्य मनाला बोचत होते. प्रथम १०० जणांमधे सुध्दा आपली गणती होत नाही.
ऑलम्पिक मधे तर आनंदच होता. खाशबा जाधवांनंतर पेस त्यांनंतर राज्यवर्धन राठोड, अभिनव बिन्द्रा...बस संपले ... लिंबाराम(धनुर्धारी) इत्यादी किती तरी महारथी होते.. फक्त प्रायोजक नसल्याने त्यांच्या सारखा महारथीचा विकास झाला नाही.. प्रयोजक का नाही..? क्रिकेट मुळे ...प्रायोजकांना माहीत आहे या देशात फक्त क्रिकेट यालाच महत्व आहे अजुन कोणत्याही खेळाला नाही. एक साधा साखळीत ला बांगलादेश विरुध्द सामन्याला आज लिअंडर पेस च्या ग्रण्डस्लॅम च्या सामन्या पेक्षा जास्त प्रेक्षक मिळतो..म्हणुन त्यात त्यांना जास्त फायदा मिळतो. आज पैसा जिथे तिथे प्रतिष्ठा..
झारखंड सारख्या राज्यात जिथुन धोनी आला तिथल्या जलतरण पटुंना बिना पाण्याचे पोहायला लावत आहे....काय हे.. याला काय म्हणावे..लाज सुध्दा वाटत नाही अशा अधिकार्याना..
२००७ नंतर काळ थोडा बदलला बॅटमिंटन, टेनिस, बुध्दिबळ, हॉकी, फुटबॉल या सारख्या खेळांना प्रसिध्दी मिळाली..का ....कारण आपण क्रिकेट च्या अतिप्रेमातुन बाहेर येत होतो...त्याच बरोबर या बाकिंच्या खेळांमधे आपले खेळाडु जीव लावुन मेहनत करीत होते. यश मिळावीत होते..बॅटमिंटन मधे गोपिचंद बरोबरीने सायना, टेनिस मधे पेस-भुपती च्या बरोबरी ने सानिया,सोमदेव्,बोपन्ना सारखे खेळाडु प्रगती च्या शिखरावर पोहचत होते...ऑलम्पिक च्या पाठोपाठ एशियाड, कॉमनवेल्थ खेळांमधे आपल्या गुणी खेळाडुनी यश पदशिख्रान्त केले.
विजेन्द्र, सुशिल कुमार इत्यादिंनी ज्या खेळामधे आपण कुठेही गणलो गेलेलो नव्हतो अशा खेळांमधे अंजिक्य झालेले....
आपण यांना ओळखु लागलो..क्रिकेट बरोबर यांना सुध्दा प्रसिध्दी मिळाली त्यांच्या हक्काची..!!
एकच प्रार्थना....सर्वांना...
विश्वचषक तर घेउन धोनी येणारच आहे.... पण
तो आल्यावर या खेळाडुंना विसरुन जाउ नका................!!!! जसे ८३ नंतर विसरुन गेलेलो........
चुकभुल द्यावी घ्यावी........