एक्स - मॅन या सुपर हिरोंचे फॅन असणार्यांना "लोगन" चित्रपटाची फार उत्सुकता होती. ह्युज जॅकमॅन याचा "वोल्वरीन" या सुपरहिरोवर स्वतंत्र श्रेणीतील ३रा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अगदी सुरुवाती पासून म्हणजे एक्स मॅन वर आधारीत पहिल्या चित्रपटापासून "वोल्वरिन" या कॅरेक्टरवर प्रेम बसलेले. दर चित्रपटासोबत ते वाढत गेले. हे प्रेम पाहून निर्मात्यांनी त्याच्यावर स्वतंत्र चित्रपट बनवण्याचे ठरवले २००९ साली X-Men Origins: Wolverine या नावाने तो रिलिज झाला. पुर्ण एक्स मॅन श्रेणीतील सर्व सुपरहिरोंमधून फक्त त्याच्यावरच चित्रपट बनला यावरून त्या कॅरेक्टरची लोकप्रियता दिसून येते. काही वर्षांनी The Wolverine हा त्या स्वतंत्र श्रेणीतील २रा भाग म्हणून समोर आला. त्यानंतर आता "लोगन" ३रा आणि शेवटचा भाग म्हणून आला आहे.
वोल्वरिन हे कॅरेक्टरच फार विचित्र होते. जखमा न होणारा, हातातून सुर्यासारखी पाती बाहेर येणारा, ऑलमोस्ट अमर असणारा, कुणाच्याही ताब्यात न येणारा, स्वतःच्या मर्जीचा मालक, कुठे ही कुणासमोर ही हार न पत्करणारा अशा विविध विशेषणे या "वोल्वरिन" कॅरेक्टरची होती. दाढी वाढलेला बिन मिशांचा चेहरा, केस दोन्ही बाजूंनी उभे असलेले. गबाळ अवतार, टापटीप नावाचा शब्दच डोक्याच्या डिक्शनरीत नसलेला असा हा "लोगन" "ह्युज जॅकमॅन" ने अक्षरश: जिवंत केलेला. इतका की जसे आपल्याकडे लोक "जय संतोषी माता" नामक चित्रपटातील अभिनेत्रीच्या पाया प्रत्यक्षात पडत होते तसे ह्युज ला बघितल्यावर लोक त्याचे हात बघत होते. कधी जगप्रसिध्द लखलखती धारदार पाती बाहेर येतील याची आशा घेऊन त्याच्या बोटांकडे लक्ष देत. पडद्यावर तो कुणाला भिडला म्हणजे समोरच्याची शामत आली हे डोक्यात फिट्ट बसले. मग त्याच्या समोर कोणी कितीही बलिष्ठ खलनायक का येईना. आपला "लोगन" पुरुन उरतोच. फक्त मॅग्निटो समोर बिचार्याचे काही चालत नव्हते. पण X-Men: Days of Future Past मधे लोगन भुतकाळात गेला होता तिथे त्याच्या अंगात लोखंड नव्हते. तेव्हा तरुण मॅग्निटो ला भारी पडलेला. एक सच्चा वॉल्वरिन प्रेमी म्हणून ते बघायला मजा आलेली.
चित्रपटाची सुरुवातीला स्पष्ट होते की लोगन आता उतारवयात आला आहे. वाढत्या वयासोबत त्याचे शरीर अशक्त होऊ लागले आहे.
सरकार सगळ्या म्युटन्ट लोकांना एक तर मारून टाकत आहे नाहीतर त्यांच्यात औषधे देऊन त्यांची शक्ती संपवत आहे. स्पेशल फोर्स अशा लोकांच्या मागे सतत लागली आहे. त्यांच्या लिस्टवर "प्रोफेसर" एक नंबरवर आहे. लोगन त्यांना घेऊन शहरांपासून लांब एका गावात साथीदाराच्या मदतीने लपवून ठेवले आहे. प्रोफेसर आता फार म्हातारे झाले. त्यांना त्याच्या मानसिक शक्ती ताब्यात ठेवता येत नाही. स्वतःच्या वृध्द वडिलांची जशी सेवा केली जाते त्या प्रकारे लोगन आपले कार्य करत आहे. एक दिवस एक बाई त्याच्या जवळ मदत मागायला येते.तिच्या मते स्पेशल फोर्सेस ने म्युटनचे जेनेटेक्स काही मुलांमधे वापरून त्यांना प्रशिक्षित केले आहे. परंतू ती मुलं हाताबाहेर जाऊ लागल्याने त्यांना मारण्याचा प्लॅन करतात. ती बाई त्यातील काही मुलांना सोडवते आणि एका गुप्त ठिकाणी सुरक्षित पाठवते तिच्या जवळ लौरा नामक एक मुलगी असते जीची शक्ती हुबेहूब लोगन सारखी आहे. तिला त्या ठिकाणी पोहचवण्याची जवाबदारी लोगन पैशाच्या मोबदल्यात घेतो. लौराच्या मागे स्पेशल फोर्स लागलेली असते. लौरा आणि स्पेशल फोर्स यांच्यामधे लोगन उभा राहतो. तो त्या मुलीला त्या इच्छित जागी पोहचवतो का? तिच्यात लोगन सारखी शक्ती कशी आली? प्रोफेसर यांना सांभाळून लोगन कसे हे काम करतो.? इ. साठी चित्रपट पहायला हवा.
वोल्वरिन हे कॅरेक्टरच फार विचित्र होते. जखमा न होणारा, हातातून सुर्यासारखी पाती बाहेर येणारा, ऑलमोस्ट अमर असणारा, कुणाच्याही ताब्यात न येणारा, स्वतःच्या मर्जीचा मालक, कुठे ही कुणासमोर ही हार न पत्करणारा अशा विविध विशेषणे या "वोल्वरिन" कॅरेक्टरची होती. दाढी वाढलेला बिन मिशांचा चेहरा, केस दोन्ही बाजूंनी उभे असलेले. गबाळ अवतार, टापटीप नावाचा शब्दच डोक्याच्या डिक्शनरीत नसलेला असा हा "लोगन" "ह्युज जॅकमॅन" ने अक्षरश: जिवंत केलेला. इतका की जसे आपल्याकडे लोक "जय संतोषी माता" नामक चित्रपटातील अभिनेत्रीच्या पाया प्रत्यक्षात पडत होते तसे ह्युज ला बघितल्यावर लोक त्याचे हात बघत होते. कधी जगप्रसिध्द लखलखती धारदार पाती बाहेर येतील याची आशा घेऊन त्याच्या बोटांकडे लक्ष देत. पडद्यावर तो कुणाला भिडला म्हणजे समोरच्याची शामत आली हे डोक्यात फिट्ट बसले. मग त्याच्या समोर कोणी कितीही बलिष्ठ खलनायक का येईना. आपला "लोगन" पुरुन उरतोच. फक्त मॅग्निटो समोर बिचार्याचे काही चालत नव्हते. पण X-Men: Days of Future Past मधे लोगन भुतकाळात गेला होता तिथे त्याच्या अंगात लोखंड नव्हते. तेव्हा तरुण मॅग्निटो ला भारी पडलेला. एक सच्चा वॉल्वरिन प्रेमी म्हणून ते बघायला मजा आलेली.
चित्रपटाची सुरुवातीला स्पष्ट होते की लोगन आता उतारवयात आला आहे. वाढत्या वयासोबत त्याचे शरीर अशक्त होऊ लागले आहे.
लोगन याचे कॅरेक्टर या चित्रपटात नेहमी पेक्षा वेगळे आहे. एक थकलेला, खचलेला वयस्कर माणूस जो सतत आश्रयासाठी भटकत असतो. त्याचे आणि प्रोफेसरला लागणार्या औषधांसाठी पैसे मिळवणे हा एकमेव उद्देश लोगनचा राहिल आहे. त्याच्या जवळची माणसे मरण पावली आहे. एक प्रोफेसर आहे म्हणून लोगन आहे. प्रतिकार करण्याची इच्छा आहे पण तितकी शक्ती आता अंगात राहिली नाही. जखम लवकर भरत नाही त्यात इन्फेक्शन होत आहे. त्यामुळे स्वभाव फार चिडचिडा झाला आहे. शरीर लवकर थकल्याने अगदी लहान मुल पण काहीवेळेस भारी पडतात. खलनायक म्हणून जे आहे त्यांच्या समोर तर अगदीच नाईलाज होतो. पण प्रतिकार मात्र शेवट पर्यंत सोडत नाही. असा लोगन पडद्यावर बघणे फार त्रासदायक आहे. कोणे एकेकाळी लोगनच्या नुसत्या ओरडण्याने समोरचा थरथर कापत होता. आता मात्र तसे काही घडत नाही. त्याला पडद्यावर मार खाताना बघवत नाही. आपण ऑटोमॅटिक तो मार खात असताना इकडे तिकडे बघू लागतो. ह्युजने वयस्कर माणसाचा अभिनय फार समरसतेने केला आहे. असे वाटते की त्याने स्वतः त्याच्या भविष्यातील ह्युज कसा असेल याचा अचूक अंदाज घेतला आहे.
लोगन आणि प्रोफेसर एक्स यांचा प्रवास इथे संपला. आता पुढे कुठल्याही चित्रपटात ह्युज हा वॉल्वरिन म्हणून दिसणार नाही याची चुटपूट कायम राहणार.
LONG LIVE WOLVERINE..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा