शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

ग्लोबल वार्मिंग - ARTICLE

बदल होने हा नियमच आहे निसर्गाचा..ग्लोबल वार्मिंग वगैरे वगैरे आपण आज बोलतोय पण केले कुणी आपणच ना..
माझ्या मते तरी निसर्ग समर्थ आहे ह्या सगळ्या गोष्टीचा निचरा करण्यासाठी फ़क्त त्याला वेळ लागतोय अणि थोडा मार्ग आणि नियम बदलत आहे..आपल्या कड़े या वेळेला पाउस उशिराने चालू झाला...मागच्या ५ -७ वर्षा पासून पाउस हा सतत उशिराने येत आहे...
कोणी लक्ष दिले या कड़े ?...
मी जेव्हा शाळेत होतो त्या वेळी पाउस हा नेमका १३ जून ला तरी हमखास यायचा..तेव्हा वाटायचे की आपण शालेला जाताना आपल्या बरोबर आपला सोबती म्हणून येतोय..पण आता सहामाही परीक्षा संपायला आली तरी..
पाउसचा पत्ता नहीं..आपला मौसमी निसर्ग बदलतोय..जो पाउस जून मधे येत होता तो आता आगस्त च्या नंतर जोर पकड्तोय..तसाच फेब्रुवारी मधे ठंडी कडाक्याची पडत आहे ती सुद्दा मुंबई सारख्या समुद्रलागत च्या शहरात..!!मार्च अप्रैल मधे तर विचारूनच नका मे महिन्यासारखे गरम होत असते..!!
निसर्ग बदलतोय..आपण सुद्दा बदलायला हवे..उगाच चिंता करून काही ही फायदा होणार नहीं जे आपण आधी केलेले आहे त्याचेच फल आता येत आहे अणि ते येणारच आहे..
आपल्या हातात फ़क्त एकाच आहे ज ज चूका आपण आधी केल्या आहेत त्या परत होऊ नये..यातच आपले कल्याण आहे..अन्यथा जे परिणाम होणार आहेत त्या पेक्षां भयंकर परिणाम आपल्याला दिसतील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: